आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor And Priyanka Chopra In Barfee Trailer

कशी तयार झाली रणबीर-प्रियंकाची 'बर्फी', पाहा व्हिडिओमध्ये

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर आणि प्रियंका चोपडा त्यांच्या आगामी 'बर्फी' चित्रपटातल्या भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. या चित्रपटात रणबीरने मूकबधिर तरुणाची भूमिका साकारली आहे, तर ऑटिसटिक तरुणीची भूमिका साकारुन प्रियंकाने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
ही कहाणी आहे मर्फी (रणबीर कपूर) उर्फ बर्फी, त्याची मैत्रीण इलिएना डी क्रूज आणि झिलमिल (प्रियंका चोपडा) या तिघांची.
रणबीर आणि प्रियंकाने आपल्या भूमिका जीवंत वाटाव्या यासाठी घेतलेली मेहनत प्रोमोमध्ये स्पष्ट दिसत आहे.
अनुराग बासूच्या या चित्रपटाचा २.३० मिनिटांचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ट्विटरवर या प्रोमोने आधीच पसंती मिळवली आहे. आता बॉक्स ऑफीसवर प्रेक्षकांना 'बर्फी'ची चव आवडणार का हे सुद्धा थोड्याच दिवसांमध्ये कळेल.
पाहा, रणबीर-प्रियंकाच्या बर्फीचा प्रोमो