आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका-रणबीरवर कतरिनाची करडी नजर, पाहा 'तमाशा'चे ऑन लोकेशन PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तमाशाच्या सेटवर दीपिका पदुकोण)

मुंबई: अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण सध्या आपल्या 'तमाशा' या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. दोघे क्रोएसियामध्ये शूटिंग उरकल्यानंतर दुस-या टप्याच्या शूटिंगसाठी तयार आहेत. आता बातमी अशी आहे, की कतरिना कैफ सध्या आपल्या कथित बॉयफ्रेंड रणबीर कपूरवर नजर ठेवत आहे.
कतरिना कैफ तिच्या नात्याविषयी नेहमीच चर्चेत असते. परंतु दोघेही आपल्या लव्ह लाइफविषयी कधीच उघडपणे बोलत नाहीत. मात्र दोघांना अनेकदा एकत्र वेळ घालवताना बघितल्या गेले आहे. कतरिना कैफ सध्या 'फँटम' या आगामी सिनेमात व्यस्त आहे. याशिवाय तिचा 'बँग बँग'सुध्दा प्रदर्शित होण्यास तयार आहे. सूत्राच्या सांगण्यानुसार, कतरिना आपल्या टाइट शूटिंग शेड्यूलमधून वेळ काढून रणबीर कपूरसह वेळ घालवणार आहे.
इम्तियाज अलीच्या 'तमाशा'मध्ये रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणसुध्दा आहे. दोघे सिनेमाच्या शूटिंगसाठी जुलैमध्ये क्रोएसियाला गेले होते. काही दिवसातच या सिनेमाचे दुस-या टप्यातील शूटिंग सुरु होणार आहे. सूत्राच्या सांगण्यानुसार, रणबीर आणि दीपिका यांची जवळीक कॅटला खपत नसल्याने ती त्याच्यावर नजर ठेवत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'तमाशा'च्या शूटिंगदरम्यानची छायाचित्रे...