आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीरने नेमला नाही प्रचारक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांनी आपला स्टारडम टिकून राहण्याबरोबरच प्रसिद्धीत नेहमी आघाडीवर राहण्यासाठी खास प्रचारकाची नियुक्ती केलेली असते. कपूर परिवारातील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळख असलेल्या रणबीर कपूरने मात्र आजपर्यंत आपला प्रचारक नेमलेला नाही. रणबीरला पहिल्यापासूनच आपल्याशी संबंधित बातम्या देणे, अन्य कलावंतांशी आपली तुलना करणे, स्वत:ची स्तुती करायला आवडत नाही. यामुळे त्याने आजपर्यंत आपला प्रचारक म्हणून कोणाचीही नेमणूक केली नाही.
रणबीरने सांगितले की, ‘लोकांनी माझ्या सिनेमावर आणि कामावर निर्थक चर्चा करू नये. ज्या लोकांना कामासाठी मला शोधायचे असते ते शोधून काढतातच. तसेही प्रसार माध्यमांमध्ये माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल नेहमीच चर्चा होत असते. त्यामुळे यापेक्षा अधिक प्रसिद्धीची मला गरज नाही.’