आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर बनणार पौराणिक सुपरहीरो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘ये जवानी है दीवानी’सारख्या सुपरहिट सिनेमाचे दिग्दर्शन करणारे अयान मुखर्जी रणबीर कपूरच्या या आगामी सिनेमाचेही दिग्दर्शन करणार आहेत.
सुपरहीरो किंवा त्यासारखेच पात्र असलेल्या अनेक सिनेमांबाबत सध्या बरीच चर्चा आहे. आधी विक्रमादित्य मोटवाणीच्या ‘भावेश जोशी’मध्ये इम्रान खानला घेणार असल्याची चर्चा होती तेव्हा असे सांगण्यात आले की, तो या सिनेमात एक गुजराती सुपरहीरो बनणार आहे. तथापि, यास दुजोरा मिळू शकला नाही. सध्या हा सिनेमा सिद्धार्थ मल्होत्रा करत आहे. अशाचप्रकारे ‘पीके’मध्ये आमिर खान एलियन साकारत आहे, पण या पात्रात सुपरपॉवर आहे की नाही, याबाबत स्पष्टता नाही. तसेच ‘क्रिश-3’सारखे सुपरहीरो सिनेमाही प्रदर्शित झाले आहेत.
आता रणबीर कपूरबाबतही अशीच चर्चा आहे. असे म्हटले जात आहे की, रणबीरचा जिवलग मित्र अयान मुखर्जी अशाच प्रकारचा एक फँटसी सिनेमा बनवत आहे. दोघांनी यापूर्वी ‘वेक अप सिड’ आणि ‘ये जवानी है दीवानी’सारख्या यशस्वी सिनेमांची निर्मिती केली आहे. कथितरीत्या त्यांच्या आगामी सिनेमाची कथा पौराणिक असेल आणि तो वर्तमान परिस्थितीवर आधारित असेल, असे बोलले जात आहे. भारताच्या पारंपरिक सुपरहीरो पात्रांप्रमाणे यात रणबीरच्या पात्रातही विशेष शक्ती असतील.
अयान मुखर्जी सध्या सिनेमाच्या कथेवर काम करत आहेत. कथेची निवड अंतिम होण्यामध्ये एक वर्षापेक्षा जास्त कालावधी जाणार असल्याचे दिसते. तोपर्यंत रणबीर कपूर आपल्या अन्य सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यग्र राहणार आहे.