आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ranbir Katrina, Aditya Roy Kapoor And Shraddha Kapoor To Go For A Vacation Together

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिक्रेट हॉलिडेसाठी तयार श्रद्धा-आदित्य आणि रणबीर-कतरिना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: (डावीकडून)आदित्य कपूर आणि श्रद्धा कपूर, रणबीर कपूर आणि कतरिना कैफ )
मुंबई: बॉलिवूड कलाकार रणबीर कपूर-कतरिना कैफ आणि आदित्य कपूर - श्रद्धा कपूर यांनी आपलं नातं सार्वजनिकरित्या मान्य केले नसले तरीही, या दोन्ही जोड्या अनेकदा एकत्र वेळ घालवतांना दिसून आल्या आहेत.
सुत्रांच्या मते, ही दोन्ही प्रेमी युगुल एका सिक्रेट व्हॅकेशनला एकत्र जाण्याच्या तयारीत आहेत. श्रद्धाचा आगामी सिनेमा 'एक विलन'चे प्रमोशन आटोपतांच, ही दोन्ही कपल्स सुट्टी घालवायला जाणार आहेत. अजून एका सुत्रानुसार रणबीर, कतरिना, आदित्य आणि श्रद्धा या सुट्टीवर जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे या दोन्ही कपल्सने डेस्टिनेशन गुपित ठेवले आहे.
आदित्यला श्रद्धाने तिचा को-स्टार सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेळ घालवणं आवडत नसल्याच्या बातम्या येत होत्या. श्रद्धा आणि सिद्धार्थच्या मैत्रीवर आदित्य नाराज आहे असेही सांगितले जात होते. परंतू आता असं वाटत आहे की या जोडीत सगळं व्यवस्थित असून आता ते पार्टीच्या मूडमध्ये आहेत.