आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा live-inमध्ये राहिल्या सुश्मिता, कंगनासह या अभिनेत्री, जाणून घ्या काय झाले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर आणि बार्बी डॉल कतरिना कैफ यांना चर्चेत राहण्याची जणू सवयच झाली आहे. कधी हे दोघे लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत येतात, तर कधी ब्रेकअप आणि पॅचअपच्या बातम्यांमुळे लाइमलाइट मिळवतात. सध्या हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार असल्याच्या बातम्यांमुळे प्रकाशझोतात आले आहेत.
बातम्यांनुसार, रणबीर आईवडिलांसोबत पाली हिल स्थित 'कृष्ण राज' या घरी राहतो. मात्र आता त्याने आपल्या आईवडिलांचे घर सोडल्याचा सोडून कतरिना कैफसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.
रणबीर आणि कतरिना आपल्यासाठी नवीन घराच्या शोधात असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. मात्र आता समजतंय, की मुंबईतील वांद्रा परिसरात या दोघांनी दोन वर्षांपूर्वीच एक फ्लॅट बूक केला असून त्याचे बांधकाम सुरु आहे. लवकरच हा फ्लॅट तयार होणार आहे. दोघेही आपले हे नवीन घर एकत्रितपणे सजवणार आहेत. यासाठी या दोघांनी गेल्या बुधवारी आर्किटेक्ट डिझायनरची भेट घेतली होती.
कतरिना रणबीरची भेट घेण्यासाठी अधूनमधून कृष्ण राजवर जायची. मात्र तिचे वारंवार घरी येणे ऋषी कपूर यांना पसंत नव्हते. त्यामुळेच रणबीर आणि कतरिनाने लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
याविषयी कतरिनाची एक मैत्रीण म्हणाली, 'कतरिना रणबीरविषयी खूप गंभीर आहे. पहिल्यांदाच तिने आपल्या करिअरपेक्षा आपल्या नात्याला जास्त महत्व दिले आहे. कतरिना यापूर्वी आपल्या नात्याविषयी इतकी गंभीर आणि स्पष्ट नव्हती. परंतु तिने आपल्या मित्र-मैत्रीणींना सांगितले, की रणबीर तिच्यासाठी सर्वकाही आहे. तिला शुटिंगमधून जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा ती त्याला भेटायला जाते. ती त्याला भेटण्यासाठी श्रीलंकेतसुध्दा गेली होती. तिथे रणबीर 'बॉम्बे वेलवेट'ची शुटिंग करत होता.'

विशेष म्हणजे आपल्या नात्याला वेळ देण्यासाठी कतरिनाने कामाप्रतिसुध्दा एक पाऊल मागे घेतला आहे. या लव्ह-बर्डनी आपल्या नात्याला पुढे वाढवण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.
लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेणारे रणबीर-कतरिना बी टाऊनमधील पहिली जोडी नाहीये. त्यांच्यापूर्वी राजेश खन्ना-टीना मुनीम, आदित्य पंचोली-कंगना राणावत, गोविंदा-राणी मुखर्जी, महेश भूपती-लारा दत्ता, सुष्मिता सेन-विक्रम भट्टसह अनेक स्टार्स लिव्ह इनमध्ये राहिले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशाच काही सेलिब्रिटींविषयी...