आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Katrina Starrer Jagga Jasoos Will Have 25 Songs

रणबीर-कॅटच्या 'जग्गा जासूस'मध्ये असणार तब्बल 25 गाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुराग बसुच्या 'जग्गा जासूस' सिनेमाचे वेळापत्रक दक्षिण अफ्रिकेमध्ये लवकरच सुरू होणार आहे. सिनेमात रणबीर कपूर एक गुप्तहेराच्या भूमिकेत असणार आहे. या सिनेमाच्या कॉमेडीला म्यूझिकल असल्याचेसुध्दा सांगितले जात आहे. कारण सिनेमामध्ये 25पेक्षा जास्त गाणी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून इतके गाणे असलेले रिलीज झालेले नाहीत.
ही गाणी सिनेमात कशी बसवली जातील? सिनेमाच्या स्वरुपात काय नावीन्य असणार याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाहीये. 'बर्फी'प्रमाणेच हा सिनेमासुध्दा मुलांना विशेष रुपात आवडणार आहे.
खास गोष्ट म्हणजे, की यामध्ये रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका नामी कॉमिक अभिनेता गोविंदा साकारणार आहे. यापूर्वी रणबीर आणि कतरिना प्रकाश झा यांच्या 2010मध्ये रिलीज झालेल्या 'राजनिती'मध्ये एकत्र दिसले होते.