आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: एकेकाळी ऑस्ट्रेलियात टॅक्सी चालवणारा हा अभिनेता आता बॉलिवूडमध्ये कमवतो लाखो रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सनी लियोनसह रणदीप हुड्डा)
मुंबई - बॉलिवूडमध्ये हळूहळू यशाकडे वाटचाल करणारा अभिनेता रणदीप हुड्डा आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2001 साली 'मान्सून वेडिंग'द्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणा-या रणदीपची फिल्मी करिअरची सुरुवात दमदार झाली नाही. मात्र 2010 साली रिलीज झालेला 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई' हा सिनेमा रणदीपच्या करिअरमध्ये टर्निंग पॉईंट ठरला. अलीकडेच तो सलमान खानसह 'किक' या सिनेमात झळकला होता.
रणदीपचे खासगी आयुष्य...
रणदीप हुड्डाचा जन्म 20 ऑगस्ट 1976 मध्ये हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील दसेया या छोट्या गावात झाला. रणदीपच्या आई वडीलांचे नाव रणबीर हुड्डा आणि आशा हुड्डा आहे. रणदीपला एक मोठी बहीण आणि एक धाटका भाऊ आहे. त्याने आपले शालेय शिक्षण सोनीपत येथील एमएनएस बोर्डिंग शाळेत पूर्ण केले. त्याला बालपणापासूनच खेळाची आवड होती. स्विमिंग आणि घोडेस्वारी रणदीपला आवडते. खेळात राष्ट्रीय स्तरावर रणदीपला अनेक मेडल्स मिळाले आहेत. रणदीपला थिएटरमध्येही आवड आहे. त्याने शालेय जीवनात अनेक नाटकांमध्ये काम केले आहे.
रणदीपने डॉक्टर व्हावे अशी त्याच्या आईवडिलांची इच्छा होती. दिल्लीतील आर. के. पुरम येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्येही रणदीपचे शिक्षण झाले आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी रणदीप 1995 साली मेलबर्नला (ऑस्ट्रेलिया) गेला. येथे त्याने मार्केटिंगमध्ये पदवी घेतली. शिवाय बिजनेस मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्येही मास्टर डिग्री प्राप्त केली.
शिक्षण पूर्ण करत असताना टॅक्सी चालवली, वेटरचे काम केले...
मेलबर्न येथे शिक्षण घेत असताना रणदीपने येथील एका चीनी रेस्टाराँमध्ये वेटरचे काम केले. शिवाय दोन वर्षे टॅक्सीसुद्धा चालवली होती. एक काळ असा होता जेव्हा पैशांसाठी मला टॅक्सी चालवावी लागली होती, मात्र आता वेळ पालटली असून माझ्याकडे लाखो रुपये आहेत, असे रणदीपने एका मुलाखतीत म्हटले होते.
मीरा नायर यांनी दिली पहिली संधी..
रणदीप थिएटरमध्येही काम करत होता. 'टू टीच हिज ऑन' या नाटकाच्या रिहर्सलदरम्यान त्याला मीरा नायर यांचा फोन आला. त्यांनी त्याला ऑडीशनसाठी बोलावले. रणदीपने मीरा नायर यांच्या 'मान्सून वेडिंग' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या सिनेमात रणदीपने एनआरआयची भूमिका साकारली होती. समीक्षकांनी या सिनेमाचे भरपूर कौतूक केले. मात्र सिनेमाला मिळालेल्या यशानंतरही रणदीपला तब्बल चार वर्षांनंतर दुसरा सिनेमा मिळाला.
रणदीपने सआदत हसन यांच्या कादंबरीवर आधारित 'काली सलवार और कुछ कहानियाँ' या नाटकातही काम केले. शिवाय आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्याने जाहिरातींमध्येही काम केले. आयएमडीबी या आंतरराष्ट्रीय चित्रपट वेबसाईटने रणदीपला 20 सेक्सी पुरुषांच्या यादीत सामील केले आहे. 'हिरोईन' सिनेमातील भूमिकेसाठी रणदीपला बेस्ट सपोर्टिंग कॅरेक्टरचा अवॉर्ड मिळाला आहे. 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई' या सिनेमासाठी रणदीपला 2011 मध्ये बेस्ट सपोर्टिंग रोलसाठी लॉयन्स गोल्ड अवॉर्ड मिळाला आहे.
रणदीपने करीना कपूर, सनी लियोन, आदिती राव हैदरी, माही गिलसह अनेक अभिनेत्रींसह स्क्रिन स्पेस शेअर केली आहे. आता तो लवकरच 'रंग रसिया' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासह नंदना सेन मेन लीडमध्ये आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रणदीपने कोणकोणत्या अभिनेत्रींसह स्क्रिनवर रोमान्स केला आहे...