आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karishma And Kareena Celebrated Randhir Kapoor Birthday Last Night

करिश्मा-करीनाने साजरा केला वडिलांचा B\'day, शुभेच्छा द्यायला पोहोचले कपूर कुटुंबातील सदस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणधीर कपूर यांच्यासोबतन करीना, करिश्मा आणि सैफ अली खान)
मुंबईः बॉलिवूड अभिनेते रणधीर कपूर 68 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्ताने त्यांची मुलगी करीना कपूर आणि जावई सैफ अली खानने खास सेलिब्रेशन ठेवले होते. वांद्रा येथील एका हॉटेलमध्ये हे सेलिब्रेशन ठेवण्यात आले होते. या पार्टीत रणधीर यांचे धाकटे बंधू ऋषी कपूर, त्यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी हजेरी लावली होती. याशिवाय रणधीर यांची बहीण रिमा जैन पती मनोज जैनसोबत पार्टीत सहभागी झाल्या होत्या.
करिश्मा कपूरसुद्धा वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आवर्जुन उपस्थित होती. अभिनेत्री पूनम ढिल्लन यांनीही सेलिब्रेशनमध्ये आपला सहभाग नोंदवला.
रणधीर कपूर यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1947 रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी पार्टीचे आयोजन केले जाते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रणधीर यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...