आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 'रंग रसिया'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचली सारिका, नंदना दिसली साडी लूकमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री सारिका आणि नंदना सेन)
मुंबई - केतन मेहता दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'रंग रसिया' या शुक्रवारी (7 नोव्हेंबर) रिलीज होत आहे. सिनेमाच्या निर्मितीचे काम 2008मध्ये सुरु झाले होते. परंतु सिनेमा पूर्ण 7 वर्षांनी रिलीज होत आहे. मंगळवारी (4 नोव्हेंबर) सिनेमाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती.
'रंग रसिया'च्या स्क्रिनिंगमध्ये सिनेमाशी जोडलेले स्टार्स सामील झाले. सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री नंदना सेनसुध्दा पोहोचली होती. नंदना रेड-गोल्ड साडी नेसून स्क्रिनिंगमध्ये आली होती. तिच्यासह सतीश कौशिक, केतन मेहता, अभिनेत्री सारिका, दीपा शाहीसोबत इतर स्टार्ससुध्दा दिसले. मात्र, रणदीप हुड्डा स्क्रिनिंगमध्ये आला नाही.
'रंग रसिया'मधील रणदीप हुड्डाची मुख्य भूमिका आहे. सिनेमा 19 शतकातील चित्रकार रवि वर्मा यांच्या चारित्र्यावर आधारित आहे. सिनेमा आपल्या बोल्डनेसने बराच चर्चेत आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'रंग रसिया'च्या स्किनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...