आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rani, Katrina, Salman , When Celebrities Became Auto Driver

'मर्दानी' राणीच नव्हे, बिग बी-सलमाननेही चालवली आहे ऑटोरिक्शा, पाहा स्टार्सची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('मेरी ब्रदर की दुल्हन' सिनेमातील एका दृश्यात कतरिना कैफ रिक्शा चालवताना, मागे अभिनेता इमरान खान)
मुंबई: शुक्रवारी (22 ऑगस्ट) रुपेरी पडद्यावर अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी' सिनेमा रिलीज झाला. वुमेन ट्रॅफिकिंगच्या विषयावर आधारित या सिनेमात राणी क्राइम ब्रांचच्या सीनीअर इस्पेक्टर शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारताना दिसते. तिच्या या 'दबंग' अवताराने सर्वांना प्रशंसा करण्यास भाग पाडले. सिनेमात राणीचे आणखी एक रंजक रुप पाहायला मिळते. ते म्हणजे ऑटोरिक्शा. एका सीनमध्ये राणी ऑटोरिक्शा चालवून खलनायकाला पकडण्याचा प्रयत्न करते.
राणीच नव्हे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी सिनेमात ऑटोरिक्शा चालवली आहे. यापूर्वी 15 ऑगस्टला रिलीज झालेल्या 'सिघम रिटर्न्स'मध्ये करीना कपूर ऑटोरिक्शा चालवताना दिसली. यापूर्वीच्या काही सिनेमे लक्षात घेतले तर, त्यातही सलमान खान, कतरिना कैफ, अक्षय कुमार, सनी देओल, जॅकी श्रॉफ, संजय कपूर आणि रितेश देशमुखसारखे कलाकार सिनेमांत ऑटोरिक्शा चालवताना दिसले आहेत.
एवढेच काय, अमिताभ बच्चन आणि जॉन अब्राहमसारखे कलाकार रिअल लाइफमध्येसुध्दा अशा रुपात दिसले आहेत. मात्र काही विशेष इव्हेंटसाठी ऑटोरिक्शा चालवताना दिसले आहेत, तर काही सिनेमाच्या प्रमोशनसाठी ऑटोरिक्शाचा सहारा घेतला होता.
या विशेष पॅकेजच्या माध्यमातून अशाच काही सेलिब्रिटींवर एक नजर टाकूया, ज्यांनी सिनेमा आणि काही खास निमित्ताने रिअल लाइफ ऑटोरिक्शा चालवली आहे...पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा तुमचे आवडते स्टार्स ऑटोरिक्शा चालवताना...