आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : राणी मुखर्जी पोहोचली लालबागच्या राजाच्या दर्शनाला, घेतला आशीर्वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लालबागच्या राजाचे दर्शन घेताना अभिनेत्री राणी मुखर्जी)
मुंबई - शुक्रवारीपासून देशभरात गणेशोत्सवाच्या सणाला सुरुवात झाली आहे. अनेकांच्या घरी लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. बॉलिवूडमध्येसुद्धा काही सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे वाजतगाजत आगमन झाले, तर काही सेलिब्रिटींनी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन श्रींचा आशीर्वाद घेतला. अभिनेत्री राणी मुखर्जीसुद्धा शुक्रवारी लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचली होती.
राणी येथे पोहोचताच तिच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी ती ब्लू कुर्त्यात दिसली. सोबत तिने पांढ-या रंगाची ओढणी घेतली होती. गळ्यात लांब माळासुद्धा होती. लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन राणीने त्यांच्या चरणी माथा टेकला.
राणीचा 'मर्दानी' हा सिनेमा 22 ऑगस्ट रोजी रिलीज झाला. या सिनेमातील राणीच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत असून या सिनेमाने आत्तापर्यंत 24 कोटींपेक्षा जास्तचा व्यवसाय केला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलेल्या राणीची खास छायाचित्रे...