आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rani Mukerji, Jaya Bachchan, Ritesh Deshmukh Attend Late Ravi Chopra\'s Prayer Meet

PICS: राणी-जयासह बॉलिवूड सेलेब्सनी वाहिली रवी चोप्रा यांना श्रध्दांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जया बच्चन, राजीव कपूर आणि अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी)
मुंबई: शनिवारी (15 नोव्हेंबर) अनेक बॉलिवूड सेलेब्स दिग्दर्शक रवी चोप्रा यांच्या प्रेयर मीटमध्ये सामील झाले होते. अभिनेता अभिषेक बच्चन, इमरान खान, रितेश देशमुख, डिंपल कपाडिया, जया बच्चन, राणी मुखर्जी, प्रेम चोप्रासह अनेक स्टार्स या प्रेयर मीटमध्ये पोहोचले होते. दिवंगत रवि चोप्रा यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी ही प्रेयर मीट होती.
गेल्या बुधवारी (12 नोव्हेंबर) रोजी रवी चोप्रा यांचे निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. फुफ्फुसाच्या कर्करोगाने गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. 'महाभारत' ही गाजलेली टीव्ही मालिका रवी चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती.

रवी चोप्रा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते बी. आर. चोप्रा यांचे चिरंजीव आणि यश चोप्रा यांचे पुतणे होते. त्यांनी जमीर (१९७५), द बर्निंग ट्रेन (१९८०), मजदूर (१९८३), दहलीज (१९८६), बागबान (२००३) आणि बाबुल (२००६) या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. याशिवाय ' भूतनाथ ' आणि 'भूतनाथ रिटर्न्स' या सिनेमांची निर्मिती त्यांनी केली.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रवी चोप्रा यांच्या प्रेयर मीटमध्ये सामील झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...