आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मर्दानी'च्या ट्रेलर लाँचिंगला दिसला राणीचा स्टाइलिश LOOK, पाहा छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेअभिनेत्री राणी मुखर्जी
मुंबई: यावर्षी एप्रिलमध्ये आदित्य चोप्रासह लग्नाच्या बेडीत अडकलेली अभिनेत्री राणी मुखर्जी नवीन आयुष्य करण्यासाठी सज्ज आहे. मंगळवारी (24 जून) तिने यशराज फिल्म्स स्टुडिओ मुंबईमध्ये 'मर्दानी' या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँच केला आहे. लग्नानंतर पहिल्यांदा राणी एका पत्रकार परिषदेमध्ये दिसली आहे. तिने सर्वांना नमस्कार करून सिनेमा संबंधित सर्व गोष्टी शेअर केल्या.
राणी या पत्रकार परिषदेमध्ये कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसली. तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची जीन्स आणि पांढ-या रंगाचा ब्लेझर परिधान केलेला होता. पायात गुलाबी रंगाची लांस सँडल आणि हातात डायमंड रिंग घातलेली होती. तिच्या या लूकमध्ये सर्वात खास तिची हँडबॅग होती. 'मर्दानी' सिनेमामध्ये राणीच्या पात्राचे नाव शिवानी रॉय कपूर आहे. ती एक मुंबई क्राइम ब्रांचमध्ये सीनिअर इन्स्पेक्टर आहे. राणी तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदा पोलिसाची भूमिका साकारत आहे.
'मर्दानी'चे दिग्दर्शन प्रदीप सरकारने केले आहे. त्यांनी राणीसह 'लगा चुनरी मे दाग' सिनेमा केला होता. याव्यतिरिक्त सिनेमाची निर्मिती आदित्य चोप्राने केली आहे. सिनेमा यशराज फिल्म्स कंपनीच्या बॅनर अंतर्गत तयार झाला असून 22 ऑगस्ट 2014ला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'मर्दानी'च्या ट्रेलर लाँचिंगला पोहोचलेल्या राणी मुखर्जीचा स्टाइलिश अवतार...