आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rani Mukerji Prays At Famous Kalighat Temple In Kolkata

सिनेमाच्या यशासाठी देवाला साकडे घालायला मंदिरात पोहोचली राणी, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कोलकाता येथील कालीघाट मंदिरात राणी मुखर्जी)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आपल्या आगामी 'मर्दानी' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जीवतोड मेहनत घेत आहे. सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ती मंगळवारी कोलकाता शहरात पोहोचली होती. येथील प्रसिद्ध कालीघाट मंदिरात तिने सिनेमाच्या यशासाठी पूजाअर्चा केली.
यावेळी राणीची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. येथे राणी अनाविला लेनिन साडीत दिसली. तिने गळ्यात ओढणीसुद्धा घेतली होती.
देवाची पूजाअर्चा केल्यानंतर राणीने येथे एक पत्रकारपरिषद घेतली. शिवाय चाहत्यांसह फोटोसुद्धा काढून घेतले. लग्नानंतर रिलीज होणारा राणीचा हा पहिलाच सिनेमा आहे.
'मर्दानी' हा सिनेमा राणीचे पती आदित्य चोप्राची निर्मिती आहे. या सिनेमात राणीच्या पात्राचे नाव शिवानी शिवाजी रॉय आहे. प्रदीप सरकार यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. येत्या 22 ऑगस्टला सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कोलकातामध्ये पोहोचलेल्या राणीची खास छायाचित्रे...