आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: मिसेस चोप्राने केले 'मर्दानी'चे प्रमोशन, पाहा इव्हेंटमधील तिचा खास लूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मर्दानी'च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये राणी मुखर्जी
मुंबई: अभिनेत्री राणी मुखर्जी लग्नानंतर करिअरला पुन्हा कलाटणी देण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. कारण तिचा 'मर्दानी' हा आगामी सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सिनेमाला यशस्वी बनवण्यासाठी मिसेस चोप्रा प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आहे. सोमवारी (4 ऑगस्ट) तिने एक पत्रकार परिषद घेऊन त्यात सिनेमाविषयीच्या काही रंजक गोष्टी पत्रकारांशी शेअर केल्या.
या इव्हेंटमध्ये राणी काळ्या रंगाचा ट्राऊजर, पांढ-या रंगाचा टॉप अशा गेटअपमध्ये दिसली. हातात अंगठी, बांगड्या तसेच ओठांवर रेड कलरची लिपस्टिक लावलेली होती. यादरम्यान राणी मीडियासमोर खूपच मनमोकळ्या गप्पा मारताना दिसली. 'मर्दानी' राणीचा पती आदित्य चोप्राने निर्मित केला आहे.
या सिनेमात राणीच्या पात्राचे नाव शिवानी शिवाजी रॉय आहे. प्रदीप सरकारने सिनेमा दिग्दर्शित केला असून 22 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. हा सिनेमा मुलांच्या तस्करीवर बेतलेला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या मिसेस चोप्राचा लूक...