मुंबई: शाहरुख खान अभिनीत 'फॅन'सह राजा मुखर्जी यशराज बॅनरमध्ये निर्माता म्हणून कामास सुरुवात करत आहे. त्याचे म्हणणे आहे, की त्याने हे पाऊल नात्यामुळे नव्हे एक व्यवसायिकरित्या करिअर करण्याच्या दृष्टीकोणातून उचलेले आहे.
राणी आणि आदित्य चोप्रा यांच्या लग्नाच्या सहा महिन्यापूर्वीच राजा मुखर्जी यशराज बॅनरचा आधिकारिकरित्या एक भाग झाला आहे. आता प्रॉडक्शन हेडच्या रुपात तो निर्मितीचा धूरा सांभाळणार आहे.
वर्षभरात केवळ पाच सिनेमे बनवणा-या या स्टुडिओमध्ये राजाला पहिल्याच सिनेमात मोठ्या कलाकारांची साथ मिळणार आहे.
सिनेमाचा दिग्दर्शक मनीष शर्मा आहे. वडील राम मुखर्जी यांच्यामुळे राजाचे सिनेमाशी नाते वाढले. त्याच्या वडिलांनी अनेक हिंदी आणि बंगाली सिनेमे बनवले होते. निर्मातासोबतच तो वडिलांसह सह-दिग्दर्शक म्हणून काम करत होता. सध्या सिनेमा दिग्दर्शक होण्याचा कोणताच विचार तो करत नाहीये. तो सध्या नवोदित म्हणून यशराजची कार्यप्रणाली शिकणार आहे.
राजा म्हणतो, 'सध्या मी यशराज बॅनरचे वर्क कल्चर शिकत आहे. फॅनसह कामास सुरुवात करेल. पुढील चार-पाच सिनेमांसाठी असेच काम करायचे आहे.'
राणी आणि राजा दोघे बहीण-भाऊ आहेत. याच नात्यामुळे त्याने यशराज बॅनरमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला का? यावर राजा स्पष्ट सांगतो, 'यशराज खूप प्रोफेशनल आणि कायद्यात काम करणारा स्टुडिओ आहे. इथे नात्याला नव्हे कामाला महत्व दिले जाते. जर तुम्ही सक्षम नसाल तर मोठे पद सांभाळूच शकत नाही. येथे कोणतेच काम उद्यावर सोडले जात नाही. बिझनेस त्यांच्यासाठी महत्वपूर्ण आहे.'
यशराजसाठी भविष्यात सिनेमा दिग्दर्शित करण्यावर तो सांगतो, की एवढी घाई नाहीये. सुरुवातीला जबाबदारी कशी पेलली जाते ते शिकाव लागणार आहे. सध्या 'फॅन'च्या तयारीत व्यस्त आहे. भावोजी आदित्य चोप्रासह काम करताना किती स्वातंत्र्य मिळेल? यावर तो म्हणतो, 'तो माझा बॉस आहेत.'