आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणी करणार आमिरचा मेकओव्हर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री राणी मुखर्जी आमिर खानची चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे आदित्य चोप्राने राणीला 'धूम 3' साठी आमिरचे रूप बदलण्याची जबाबदारी सोपवली आहे.

आगामी 'धूम 3' चित्रपटात आमिर खानचा लूक थोडा वेगळ्या धाटणीचा करण्यासाठी चित्रपटातले सर्वच लोक मेहनत घेत आहेत. या चित्रपटात आमिर खलनायकाच्या भूमिकेत आहे. त्याच्या पात्राला वेगळेच रूप देण्याचा निर्मात्याचा विचार होता. आदित्यने आमिरचा लूक ठरवला होता, पण तो आमिरला आवडला नाही आणि त्याने चक्क ती भूमिका करण्यास नकार दिला. त्यामुळे निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राने आपल्या प्रेयसीला अर्थातच राणी मुखर्जीला आमिरच्या मेकओव्हरची जबाबदारी सोपविली आहे. आमिर आणि राणीची पक्की मैत्री आहे. याची जाणीव आदित्यला आहे. त्यामुळे राणीला ही जबाबदारी सोपविली आहे. तर पाहू राणी 'राजा हिंदुस्थानी'चे रूप कसे बदलते.
सुपरफिट आमिर खान
यांच्या मुठीत अमिताभ, आमिर, शाहरुख
जॅकी दादाचा मुलगा देणार आमिर खानला ट्रेनिंग