आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नानंतर बदलले नाही आडनाव, राणी चोप्रा नव्हे राणी मुखर्जी म्हणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रासह लग्न करुन इंडस्ट्रीतील पावरफुल महिला बनलेली राणी मुखर्जी अलीकडेच आगामी 'मर्दानी' सिनेमाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात पोहोचली होती. लग्नानंतर राणीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.
आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखल्या जाणा-या राणीने या कार्यक्रमात उपस्थितांचे लाडूने तोंड गोड केले. आपल्या सिनेमाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाच्या निमित्ताने राणीने लग्नानंतर पहिल्यांदाच मीडियाशी बातचित केली. यावेळी राणीमध्ये दिसलेला 'बॉससारखा अॅटीट्युड' आणि बॉडी लॅग्वेजमधील 'चोप्रा टशन' चर्चेचा विषय होता.
यावेळी राणीच्या हाताच्या बोटात महागडी हि-याची अंगठी दिसली. शिवाय पत्रकारांशी बोलताना ती आपल्या पिवळ्या रंगाच्या स्टायलिश बॅगची जास्त काळजी घेताना दिसली. कदाचित ही बॅग तिला तिच्या पतीने दिलेल्या महागड्या भेटवस्तूंपैकी एक असावी.
जाणून घ्या यावेळी कोणकोणत्या विषयांवर राणीने गप्पा मारल्या...
तू आता चोप्रा नावाने ओळखली जाणार की मुखर्जी?
- मला माझे नाव प्रिय आहे. माझे चाहते मला राणी मुखर्जी या नावानेच ओळखतात. त्यामुळे सिनेमांमध्ये मी आपले नाव बदलणार नाही. मात्र जेव्हा माझा मुलगा शाळेत प्रवेश घेईल, त्यावेळी राणी चोप्रा हे नाव नक्की लिहिल.
पुढे जाणून घ्या आणखी काय म्हणाली राणी...