आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हसिना पारकर’वरील चित्रपटाला राणीचा होकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर राणी मुखर्जी महिलांवर आधारित असलेल्या दमदार विषयाच्या सिनेमांची निवड करताना दिसत आहे. ‘मर्दानी’नंतर राणी अपूर्व लखियाच्या सिनेमात प्रमुख भूमिका करणार असल्याचे समजते. हा सिनेमा दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरच्या मुंबईमधील अंडरवर्ल्ड जगतावर आधारित आहे.
‘सरफरोश’मध्ये आमिर खानने साकारलेल्या एसीपी अजय सिंह राठोडच्या पात्राप्रमाणे राणी ‘मर्दानी’मध्ये डॅशिंग पोलिस आधिका-याच्या भूमिकेत आहे. ती मुंबई गुन्हे शाखेची सीनियर इन्स्पेक्टर शिवानी शिवाजी रॉय बनली आहे. आमिर ‘सरफरोश’मध्ये आतंकवादी आणि हत्यारांच्या तस्करीचे प्रकरण उघडकीस आणतो तर राणी ‘मर्दानी’मध्ये मुलींच्या तस्करीचा प्रश्न सोडवताना दिसते. राणीने आपल्या करिअरमध्ये सिनेमांच्या विषयांची निवड करताना आमिर खानच्या पावलावर पाऊल टाकले आहे. राणी आपल्या आगामी सिनेमात एका दमदार भूमिकेत दिसणार आहे.
सूत्रानुसार, राणीचा आगामी सिनेमा हसिना पारकरच्या जीवनावर आधारित असल्याचे कळते. सिनेमाची कथा मुंबईमधील नागपाडा भागातील हसिना आपा नावाने राज्य करणा-या त्या महिलेची आहे जी माफिया डॉन दाऊद इब्राहिमची बहीण होती. मागील महिन्यातच हसिनाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हसिनाची मुंबईमधील दाऊदचा व्यवसाय सांभाळणारी महिला म्हणून ओळख बनली होती. वास्तविक हसिना आपल्या भावाच्या व्यवसायाशी माझा कसलाही संबंध नसल्याचे नेहमी सांगत राहिली. मात्र कथितरीत्या मुंबईमधील अंडरवर्ल्डचे सर्व व्यवहार तिच्याच नावाने चालत असत. अंडरवर्ल्ड विश्वातील या महत्त्वपूर्ण सिनेमाची तयारी अनेक वर्षांपासून चालू आहे.
‘शूटआउट एट लोखंडवाला’फेम दिग्दर्शक अपूर्व लखियाने हसिनाकडून या सिनेमामध्ये तिच्या कथेची परवानगी घेतली होती. सूत्रानुसार, राणीने हसिना पारकरची भूमिका करण्यासाठी ग्रीन सिग्नल देखील दिला आहे. शिवाय हसिनाप्रमाणे दिसण्यासाठी राणीने वजन वाढवण्याची अट मान्य केली आहे. मात्र हसिनाचे कुटुंबीय या सिनेमाला विरोध करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.