आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मर्दानी'च्या प्रमोशनसाठी झाशीत पोहोचली राणी, महिला पोलिसांना केले सन्मानित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(झाशीमध्ये 'मर्दानी'च्या प्रमोशनवेळी महिला पोलिसाला सन्मानित करताना राणी मुखर्जी)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या आपल्या आगामी 'मर्दानी' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमात मर्दानी पोलिस अधिका-याच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता.
सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने राणी अलीकडेच झाशीत पोहोचली होती. येथे तिने महिला पोलिसांची भेट घेऊ आपल्या सिनेमाचा प्रचार केला. यावेळी राणीचा भाऊ राजा मुखर्जी आणि सिनेमाची टीम तिच्यासह होती.
झाशीत आयोजित एका कार्यक्रमात राणीने महिला पोलिसांना सन्मानित केले. हा सिनेमा सर्वांना नक्की आवडेल, असा विश्वास राणीने यावेळी व्यक्त केला. हा सामाजिक सिनेमा असून सेन्सॉरने त्याला ए सर्टिफिकेट दिले आहे. यावेळी राणी म्हणाली, की जर तुम्हाला मुलगी असेल, तर तिला कराटे आणि मार्शल आर्ट नक्की शिकवा. सेल्फ डिफेन्स खूप गरजेचे असल्याचे तिने म्हटले.
हा सिनेमा राणीचे पती आदित्य चोप्रा यांनी प्रोड्युस केला असून प्रदीप सरकार दिग्दर्शक आहेत. येत्या 22 ऑगस्ट रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सिनेमाच्या प्रमोशनवेळी क्लिक झालेली राणीची खास छायाचित्रे...