आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer Deepika To Tie The Knot During Bajirao Mastani?

GOOD NEWS: रणवीर-दीपिका 2015मध्ये चढणार बोहल्यावर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण)
मुंबई - रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही यावर तर्कवितर्क
लावणे आता बंद होणार आहे. कारण आता ताजी बातमी ही आहे, की पुढील वर्षी म्हणजे 2015 लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्याचा विचार या दोघांनी केला आहे.
दोघांसह काम करणा-या एका दिग्दर्शकाच्या मते, दीपिका आणि रणवीर एकमेकांविषयी खूप गंभीर आहेत. सार्वजनिक ठिकाणी असताना हे दोघे असे वागतात, जणू की फक्त चांगले मित्र आहेत. मात्र जेव्हा या दोघांना एकांत मिळतो, तेव्हा एकमेकांविषयी असलेल्या भावना ते लपवू शकत नाहीत.
झोया अख्तरच्या 'दिल धडकने दो' या सिनेमाच्या संपूर्ण युनिटला या दोघांच्या जवळीकबद्दल कल्पना आहे. या सिनेमात काम करणा-या एका अभिनेत्याने सांगितले, की रणवीर आमच्यासह इस्तानबूलमध्ये शूटिंग करत होता. त्यावेळी रणवीर दीपिका यांचे सूत जुळले असल्याची मला कल्पना नव्हती. एकेदिवशी अचानक आमच्या सेटवर दीपिका पोहोचली. मला वाटले, की तिचा आमच्या सिनेमात एखादा स्पेशल अपिअरन्स असले. मी झोयाला याविषयी विचारले असता तिने माझ्याकडे बघून फनी लूक दिला. तेव्हा कुठे मला कळले, की दीपिका सेटवर खास रणवीरला भेटायला आली होती. मी झोया आणि इतर अभिनेत्यांकडून ऐकले आहे, की पुढील वर्षे दोघे लग्नाचा विचार करत आहेत.
एका विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळींच्या 'रामलीला' या सिनेमाच्या सेटवर या दोघांमधील प्रेम फुलू लागले होते. यापूर्वी संजय लीला भन्साळी यांच्याच 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाच्या सेटवर सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात सूत जुळले होते.
रणवीर आणि दीपिकाला आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. साहजिकच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एकत्र वेळ घालवण्याची संधी या दोघांना मिळणार आहे. या सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर दोघे बोहल्यावर चढण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रणवीर आणि दीपिकाची अलीकडच्या काळात क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...