आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • AIB Roast: FIR In Pune Against AIB, Karan Johar, Ranveer Singh And Deepika Padukone

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AIB: अश्लील शोमध्ये दीपिकाला Kiss केल्याने रणवीरविरोधात पोलिस तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह)

नवी दिल्लीः 'एआयबी' या वादग्रस्त कॉमेडी शोमुळे रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर आणि करण जोहर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पुण्यात या सर्वांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही तक्रार पुण्यातील वजीर हुसैन शेख नावाच्या पोलिस इन्स्पेक्टरने दाखल केली आहे.
आपल्या तक्रारीत शेख यांनी म्हटले आहे, की सार्वजनिक ठिकाणी रणवीर सिंहने दीपिका पदुकोणचे चुंबन घेतले आणि दीपिकाने त्याला तसे करु दिले. शेख यांच्या मते, मुंबईतील एका स्टेडिअमवर हा शो आयोजित करण्यात आला होता. येथे चार हजार लोक उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे चुंबन घेणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एफआयआरमध्ये बॉलिवूडच्या चार प्रसिद्ध कलाकारांवर आक्षेपार्ह्य कृती केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पुण्याचे पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी तक्रार दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
अन्य आठ जणांविरोधातही तक्रार
रणवीर सिंह, अर्जुन कपूर आणि करण जोहर यांच्याव्यतिरिक्त एफआयआरमध्ये कॉमेडियन अबिश मॅथ्यू, तन्मय भट, अदिती मित्तल, सिमरन खांबा, आशिष शाक्य, रघु राम, रोहन जोशी आणि चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांच्या नावाचा समावेश आहे.
पुढे वाचा, अर्पिताची खिल्ली उडवल्याने भडकला होता सलमान...