आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer Deepika's Unseen Picture From Finding Fanny

OMG! रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे छायाचित्र झाले लीक, तुम्ही स्वतः बघा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('फाइंडिंग फॅनी' या सिनेमाच्या एका छायाचित्रात रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण)

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी एक खास बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. ही बातमी म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लग्नगाठीत अडकले आहे. त्यांच्या लग्नाचे छायाचित्रसुद्धा समोर आले आहे. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगता रंगता त्याच्या लग्नाची बातमीसुद्धा येऊन धडकल्यामुळे अचंबित झाला असाल ना... अहो या रिअल लाइफ कपलने लग्न केले हे खरे आहे, मात्र खासगी आयुष्यात नव्हे तर त्यांचा आगामी 'फाइडिंग फॅनी' या सिनेमात हे दोघे ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठीत अडकले आहेत.
या पोस्टरमध्ये दुल्हन झालेली दीपिका पांढऱ्या गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत आहे. दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी दीपिका आणि रणवीर यांची लव्ह स्टोरी कॅश करण्यासाठी हे छायाचित्र रिलीज केल्याचे म्हटले जात आहे.
रणवीर, दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूर अभिनीत 'फाइंडिंग फॅनी'मध्ये कॅमियो करणार आहे. तो या सिनेमात दीपिकाच्या दिवंगत पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा एक रोड ट्रिपची कहानी आहे. त्यामध्ये पाच लोक एका व्यक्तीच्या 'फॅनी'च्या शोधात निघतात.
'फाइडिंग फॅनी' या सिनेमात रणवीर आणि दीपिकासह अर्जुन कपूर, डिंपल कपाडिया, पंकज कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सैफ अली खान आणि दिनेश विजानने निर्मित हा सिनेमा यावर्षी 12 सप्टेंबर रोजी हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'फाइडिंग फॅनी' या सिनेमाची छोटीशी झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा या सिनेमाची Unseen छायाचित्रे...