आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFAमध्ये रणवीरने केले दीपिकाला प्रपोज, भेटवस्तूच्या स्वरुपात दिले 'LOVE'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंग हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. आता तर रणवीरने आपल्या नात्याल मैत्रीपेक्षा पुढे जाऊन वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केलाय. बातमी आहे, की ‘आयफा’ सोहळ्यादरम्यान रणवीर सिंगने दीपिकाला प्रपोज केले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे रणवीरचा हा प्रस्ताव दीपिकानेदेखील स्वीकारलाय. याशिवाय रणवीरने दीपिकाला एक सोन्याचे पेंडेंट दिले असून त्यावर इंग्रजीत 'LOVE' असे लिहिले आहे. हे पेंडेंट सध्या दीपिकाच्या गळ्यात दिसत आहे. (वरील छायचित्रातदेखील दीपिकाच्या गळ्यात रणवीरने तिला दिलेले पेंडेंट दिसत आहे.)
रणवीर आणि दीपिका दोघेही सध्या करिअरमध्ये एका उंचीवर पोहचलेत. यशस्वी होण्याचा मंत्र त्यांना जणू कळू लागलाय. गोलियों की रासलीला राम-लीला, चेन्नई एक्सप्रेस, ये जवानी है दीवानी आणि रेस 2 या चार सिनेमांत दीपिका सुपरहिट ठरलीय. गेल्या दोन वर्षांपासून दीपिका आपली जादू सिल्व्हर स्क्रिनवर चालवतेय. रणवीरच्याही 'गोलियों की रासलीला राम-लीला' आणि 'गुंडे' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं. 'गोलियों की रासलीला राम-लीला' या सिनेमातील रणवीर-दीपिकाच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली . आता खासगी जीवनातही त्यांची केमिस्ट्री चांगलीच रंगत आहे.
एकंदरीतच रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर नात्यालाच धास्तावलेली दीपिकाचे मन वळवण्यात रणवीर मात्र यशस्वी झालाय, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
ऑन आणि ऑफ स्क्रिनवरील ही हिट जोडी आता आगामी 'फाइंडिंग फॅनी'मध्ये एकत्र दिसणार आहे. पुढील स्लाईड्समध्ये पाहा या हिट जोडीची खास छायाचित्रे...