(अभिनेता रणवीर सिंह)
मुंबई: सुपरस्टार होण्यासाठी वेगाने पुढे जाणारा अभिनेता रणवीर सिंह सोमवारी (6 ऑक्टोबर) एक कार लाँचिंग इव्हेंटमध्ये सामील झाला होता. तो कार कंपनीच्या नवीन मॉडेलला प्रमोट करत आहे. या प्रमोशन इव्हेंटमध्ये रणवीर नवीन लूकमध्ये दिसला.
रणवीर इव्हेंटमध्ये थ्री पीस सूट परिधान करून पोहोचला होता. त्याचा सूट स्लेटी रंगाचा आणि चेक पॅटर्नचा होता. या सूटला Zegnaने डिझाइन केले आहे. त्याने ऑफ व्हाइट शर्टसोबत फ्लोअर टाय घालून आला होता.
आपल्या लूकला त्याने रेड लेदर बूटसोबत पूर्ण केले होते. रणवीरच्या लूकमध्ये सर्वात खास त्याची हेअरस्टाइल होती. त्याची The Mainstream Hipster हेअरस्टाइल होती. नवीन हेअरस्टाइलमध्ये तो खूपच कूल दिसून येत होता.
रणवीर आज करणार मुंडन
संजयलीला भन्साळीच्या 'बाजीराव मस्तानी' सिनेमात रणवीर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगत आहेत. या भूमिकेसाठी तो मुंडनदेखील करत आहे, असे कळते. सूत्रांच्या सांगण्यानुसार, आज (7 ऑक्टोबर) रणवीर मुंडन करणार आहे. म्हणून त्याने
मुंडन करण्यापूर्वी नवीन हेअरस्टाइल केली होती.
रणवीरचा काही दिवसांपूर्वी 'गुंडे' हा सिनेमा रिलीज झाला होता. तसेच, 'फाइंडिंग फॅनी'मध्ये त्याने कॅमियो भूमिका साकारली होती. यावर्षी त्याचा 'किल दिल' आगामी सिनेमा आहे. 14 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार असल्याचे सांगितले. यशराज फिल्म्स अंतर्गत तयार करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लाँचिंग इव्हेंटमध्ये रणवीर सिंहच्या नवीन लूकची छायाचित्रे...