आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: डिफरंट स्टाइलचा शौकिन आहे रणवीर, पाहा त्याच्या Looksची 13 छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिफरंट लूकमध्ये अभिनेता रणवीर सिंह
बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत सामील असलेला रणवीर आज त्याचा 29वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये जम बसवणारा रणवीर नेहमी आपल्या लूकने चर्चेत असतो. अनेक बॉलिवूड स्टार्सना क्लिन शेवमध्ये राहणे पसंत असते मात्र रणवीरला दाढी-मिशा वाढवणे आवडते.
रणवीरचा जन्म 6 जुलै 1985ला मुंबईमध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव जगजीतसिंग भगनानी आणि आईचे अंजू भगनानी आहे. रणवीरला बालपणीपासूनच अभिनयाची आवड होती. त्याने बालपणी थिएयट करण्यास सुरूवात केली होती. ती यादरम्यानसुध्दा आपल्या चेह-यावर वाढलेली मिशी ठेवत होती. अर्थातच त्याला मिशी वाढवण्याची बालपणीपासूनच आवड आहे. रणवीर सध्या बॉलिवूडमधील सर्वात जास्त लूक बदलणारा स्टार बनला आहे.
जेव्हा रणवीरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती, तेव्हा मात्र तो क्लिन शेव ठेवत होता. त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात 'बँड बाजा बारात' (2010)मधून केली. त्यानंतर 'रिकी वर्सेस रिकी बहल', 'लुटेरा', 'गोलियो की रासलीला-रामलीला' आणि 'गुंडे' या सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. रुपेरी पडद्यावर दीपिकासह त्याची जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. दोघे '...रामलीला'मध्ये एकत्र दिसले होते.
रणवीरसिंगच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्या बदलते लूक्स दाखवणार आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा रणवीरची 13 छायाचित्रे...