मुंबई: रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा अभिनीत 'दिल धडकने दो' या सिनेमाच्या शूटिंगचे दुसरे वेळापत्रक सुरु झाले आहे. काल (6 ऑगस्ट) मुंबईच्या महबूब स्टुडिओच्या बाहेर रणवीर, प्रियांका यांच्यासह फरहान अख्तर आणि सिनेमाची दिग्दर्शिक जोया अख्तर दिसली.
महबूब स्टुडिओमध्ये रणवीर टी-शर्ट आणि लोअरमध्ये दिसून आला. तसेच प्रियांका ग्रे-शर्ट आणि लोअर अशा गेटअपमध्ये दिसली. फरहान हिरव्या रंगाच्या टी-शर्ट आणि जीन्सच्या लूकमध्ये खूपच कूल दिसला. 'दिल धडकने दो' 5 जून 2015मध्ये रिलीज होणार आहे. सिनेमात अनिल कपूर आणि अनुष्का शर्मासुध्दा दिसणार आहेत. सिनेमाच्या पहिल्या शेड्यूलचे वेळापत्रक फ्रान्स, स्पेन, इटली आणि तुर्कीमध्ये पूर्ण झाले.
फरहानसह रितेश सिधवानीने सिनेमा निर्मित केला आहे. 'दिल ढकने दो'मध्ये रणवीरच्या पात्राचे नाव कबीर, फरहानच्या सनी आणि अनुष्काच्या पात्राचे नाव फराह आहे.
महबूब स्टुडिओच्या बाहेर दिसलेल्या या सेलेब्सची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...