आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-शर्ट, बूट, हातावर रणवीरने लिहिले 'KILL DIL', अशा अंदाजात करतोय प्रमोशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणवीर सिंह)
मुंबई: रणवीर सिंहचा 'किल दिल' हा आगामी सिनेमा आहे. या सिनेमा याच महिन्यात 14 तारखेला रिलीज होत आहे. कलाकारांनी सिनेमाचे प्रमोशनसुध्दा सुरु केले आहे. रणवीरला रविवारी (2 नोव्हेंबर) रात्री मुंबईमध्ये स्पॉट करण्यात आले. त्यावेळी तो नवीन लूकमध्ये दिसला.
रणवीरला जेव्हा स्पॉट करण्यात आले तेव्हा त्याने ब्लॅक स्लीवलेस टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केलेली होती. त्याच्या टी-शर्टवर 'किल दिल' नाव लिहिलेले होते. त्याने कलरफुल शू घातलेले होते. त्यावरसुध्दा सिनेमाचे नाव लिहिलेले होते. त्याने उजव्या हातावर सिनेमाच्या नावाचा टॅटू गोंदलेला होता. 'बाजीराव मस्तीनी' सिनेमासाठी त्याने टक्कल केले आहे. रणवीरला स्पॉट केल्यानंतर त्याने कॅमे-यासमोर अनेक पोज दिल्या.
'किल दिल' शाद अलीने दिग्दर्शित केला असून आदित्य चोप्राने निर्मित केला आहे. सिनेमात परिणीती चोप्रा. अली जाफर, गोविंदासुध्दा मुख्य भूमिकेत आहेत. यशराज बॅनर अंतर्गत हा सिनेमा तयार करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रणवीर स्पॉट करण्यात आलेली छायाचित्रे...