आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer Singh To Take Marathi Lessons For Bajirao Mastani

सिनेमासाठी अभिनेते घेतायेत विविध भाषेचे धडे, रणवीर शिकणार मराठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय लीला भन्साळी 'बाजारीव मस्तानी' सिनेमात प्रमुख भूमिका असलेल्या रणवीरसाठी मराठी शिक्षकाचा शोध घेत
आहेत, जे त्याला चांगली मराठी शिकवतील. रणवीरसिंहने संजय लीला भन्साळीचा 'गोलियों की रासलीला रामलीला' सिनेमात गुजराती शैली चांगल्या पद्धतीने साकारली होती. मात्र, आता त्याला 'बाजीराव मस्तानी' सिनेमात मराठी टोन आणण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे संजय लीला भन्साळी आणि सिनेमाचे संवाद लिहिणार्‍या प्रकाश कपाडियांनी रणवीरसाठी मराठी शिक्षकाचा शोध घेणे सुरू केले आहे. असे झाल्यास रणवीरचे सिनेमातील संवादफेक उत्कृष्ट राहतील.
भन्साळींच्या जवळच्या एका सूत्रानुसार 'रणवीरला आपली शब्दयोजना सुधारण्याबरोबरच मराठी भाषेवरती प्रभुत्व मिळवायचे आहे. कोणतीही भाषा माहीत नसल्याकारणाने त्यातील शब्दांना चुकीच्या पद्धतीने उच्चारणे संजयला अजिबात आवडत नाही. खरे तर रणवीर मराठी भाषेशी परिचित असून त्याला थोडीफार मराठी बोलतादेखील येते. मात्र, या भूमिकेत क्लिष्ट मराठीचा वापर असलेले संवाद आहेत. त्यामुळे मराठी भाषेचा सराव करणे रणवीरला आवश्यक आहे.
बाजीराव 1720 च्या दशकातील छत्रपती शाहू महाराज (चौथे) यांच्याकडे पेशवा म्हणून होते. या सिनेमाची पार्श्वभूमी ऐतिहासिक आहे. त्यामुळे भन्साळींना सिनेमामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव ठेवायची नाही. सिनेमातील पात्र हे हुबेहूब असायला हवे, असे संजयचे म्हणणे आहे. याची शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. मात्र, भन्साळी लवकरच रणवीरच्या मराठी भाषेवर काम करण्यास सुरुवात करणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणता अभिनेता कोणत्या सिनेमासाठी घेतोय विविध भाषेचे धडे...?