आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा सिनेसृष्टीत कार्यरत होत्या जयललिता, पाहा तामिळनाडूच्या CMचे RARE PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जयललिता यांची जुनी छायाचित्रे...)

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आणि त्यांच्या तीन सहकार्‍यांना बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी बंगळुरु विशेष न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जयललिता यांना 100 कोटींचा दंडसुद्धा ठोठावण्यात आला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधिश जॉन मायकल डिकुन्हा यांनी पराप्पना अग्रहारा तुरुंग परिसरात तयार करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात हा निर्णय दिला आहे.
65 वर्षीय जयललिता यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 रोजी मेलुकोट, कर्नाटकमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव जयललिता जयराम आहे. त्यांनी 1991 पासून ते आत्तापर्यंत चार वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.
मुख्यमंत्री पदावरील त्यांचा कार्यकाळ अशाप्रकारे..
>> 24 जून 1991पासून ते 12 मे 1996 पर्यंत
>> 14 मे 2001पासून ते 21 सप्टेंबर 2001 पर्यंत
>> 2 मार्च 2002 पासून ते 12 मे 2006 पर्यंत
>> 16 मे 2011 पासून ते आतापर्यंत

अभिनेत्रीच्या रुपात करिअरला सुरुवात...
जेव्हा त्या 15 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या आईने त्यांना सिनेमात काम करण्यासाठी प्रेरित केले होते. याच वयात त्यांनी कन्नड भाषेतील Chinnada Gombe'(1964)मध्ये काम केले. त्याच्या पुढील वर्षी त्यांनी 1965मध्ये तमिळ सिनेमामध्ये 'Vennira Aadai' दमदार अभिनय केला. याच वर्षी त्यांनी एका तेलगू 'Manushuru Mamathalu' सिनेमामध्येही काम केले.
पहिल्या अभिनेत्री ज्यांनी तामिळ सिनेमात परिधान केला होता स्कर्ट...
जयललिता यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये एकुण 130 सिनेमे केले आहेत. 1961मध्ये 'Episite' या इंग्रजी सिनेमापासून अभिनयाच्या जगात दमदार पाऊल ठेवणा-या जयललिता यांनी 1980पर्यंत सतत दाक्षिणात्य सिनेमांत काम करुन दाक्षिणात्य इंडस्ट्रीवर राज्य केले. दाक्षिणात्य सिनेमात स्कर्ट घालण्याचा ट्रेंड त्यांनीच सुरू केला. सर्वात सर्वप्रथम त्यांनीच दाक्षिणात्य सिनेमात स्कर्ट घालायला सुरुवात केली होती.

बॉलिवूडमध्ये एकमेव सिनेमा...
जयललिता यांनी फिल्मी करिअरमध्ये अनेक भाषांच्या सिनेमात काम केले. त्यांनी विशेष म्हणजे, तमिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमांमध्ये काम केले आणि त्यांना त्यासाठीच ओळखले जात होते. परंतु 1968मध्ये त्यांनी 'इज्जत' या बॉलिवूड सिनेमात काम केले. या सिनेमात धर्मेंद्र त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होते.

तीन वेळा मिळाला फिल्मफेअर अवॉर्ड...
जयललिता यांना दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये गणले जाते. त्यांना दमदार अभिनयासाठी तीन वेळा फिल्मफेअरच्या उत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काने सन्मानित करण्यात आले आहे. पहिला फिल्मफेअर त्यांना शिवाजी गणेशन यांच्या 'Pattikada Pattanama'(1971) सिनेमासाठी मिळाला होता. याचवर्षी 'श्री कृष्ण सत्य' या तेलगु सिनेमासाठी त्यांना दुसरा फिल्मफेअर मिळाला होता. 1973मध्ये तमिळ सिनेमा 'Suryakanthi'साठी त्यांना तिस-यांदा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

राजकारणातील प्रवेश...
असे म्हटले जाते, की 1977मध्ये तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री रामचंद्रन यांनी जयललिता यांना राजकारणात आणले होते. परंतु जयललिता या गोष्टीला नाकारतात. 1982मध्ये त्यांनी रामचंद्रन यांच्या 'ऑल इंडिया अन्ना ड्रविड मुनेत्र कझगम' (AIADMK) पक्षात प्रवेश केला होता. 1983मध्ये त्यांना प्रचार समितीचे सचिवपद मिळाले होते. याचवर्षी पहिल्यांदा तिरुचेंदर विधानसभाच्या सीटवरून त्या आमदार पदावर निवडून आल्या.

जयललिता यांना इंग्रजी भाषा अवगत असल्याने रामचंद्रन यांची इच्छा होती, की जयललिता यांनी राज्यसभेवर जावे. 1984 पासून ते 1989पर्यंत त्यांनी त्यांची राज्यसभेत आपले स्थान कायम ठेवले होते. 1989 मध्ये जयललिता यांनी तमिळनाडू विधानसभेमध्ये अपक्षच्या रुपात स्वत: जबाबदारी संभाळली. 24 जूनला पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदावर त्या निवडून आल्या होत्या.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा जयललिता यांची दुर्मिळ छायाचित्रे...