आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare Pictures Of Bollywood Actor Shatrughan Sinha\'s Patna Home

हे आहे शत्रुघ्न सिन्हा यांचे पाटण्यातील घर, भेटा त्यांच्या कुटुंबीयांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शत्रुघ्न सिन्हा यांचे पाटण्यामधील घर आणि आई श्यामा सिन्हासोबत बिहारी बाबू)
मुंबई- बॉलिवूडमध्ये बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा यांची एकेकाळी अशी जादू होती, की धर्मेंद्र आणि अमिताभ यांच्याऐवजी शत्रुघ्न यांना सिनेमा घेण्यासाठी निर्माता आणि दिग्दर्शकांची चढाओढ असत. शत्रुघ्न सिन्हा बॉलिवूडचे पहिले अभिनेता आहेत, ज्यांनी सिनेमांसह राजकारणातसुध्दा सक्रिय राहिले. ते बिहारची राजधानी पटनामधून भाजपचे खासदार आहेत.
बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म 9 डिसेंबर 1945मध्ये पाटण्याच्या कदमकुआमध्ये झाला. त्यांच्या वडिलांना इच्छा होती, की तिन्ही भावांप्रमाणे शत्रुघ्न यांनीही साइंटिस्ट आणि डॉक्टर व्हावे. परंतु शत्रुघ्न सिन्हा यांना या दोन्ही क्षेत्रात रुची नव्हती. त्यांनी पाटण्याच्या सायन्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले.
पाटण्याच्या कदमकुआमध्ये शत्रुघ्न यांचे पुश्तैनी मकान आहे. त्यांचे वडील डॉ. भुवनेश्वर प्रसाद सिन्हा यांनी हे घर बांधलेले आहे. एक दिवस शत्रुघ्न यांनी वडिलांना न सांगत पुण्याच्या फिल्म इंडस्टीस्ट्युडमध्ये प्रवेश फॉर्म भरला. परंतु वडिलांनी त्यावर सही करण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांचे मोठे भाऊ लखन यांनी फॉर्मवर सही केली आणि त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांचा सर्वात मोठा भाऊ राम अमेरिकेत शास्त्रज्ञ आहे. दुसरा भाऊ लखन इंजिनिअर आहे आणि तिसरा भाऊ लंडनमध्ये डॉक्टर आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. शत्रुघ्न यांचे मित्र राजीव कुमार सांगतात, ती शत्रुघ्न सिन्हा यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण्यामध्ये गरीबांना आणि अंध मुलांना फळ आणि चादर वाटप केली जाते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शत्रुघ्न सिन्हा यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे....