आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपिनाथ मुंडेंच्या उपस्थित रंगला \'तिचा उंबरठा\' मराठी सिनेमाचा मुहूर्त सोहळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सिनेमाचा झेंडा आज संपूर्ण जगात मानाने फडकत आहे. भारतीय सिनेमहोत्सवांपासून परदेशी पारितोषिक सोहळ्यापर्यंत गगन भरारी घेत आहे. बॉलिवूडपासून ते टॉलिवूडपर्यंत सर्वच स्टार्स आणि दिग्दर्शकांना मराठी सिनेसृष्टीचे वेध लागले आहे. बॉलिवूड अ‍ॅक्शनला ग्लॅमरचा चेहरा देणारे विख्यात अ‍ॅक्शन दिग्दर्शक रवी दिवाण यांनीही मराठी सिनेमा बनवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.
अ‍ॅक्शन दिग्दर्शक रवी दिवाण यांच्या स्टंट्स दिग्दर्शनामुळे बॉलिवूड स्टार्स अनिल कपूरपासून ते सुनील शेट्टीसारख्या अनेक स्टार्सनी अ‍ॅक्शन हीरोच्या रुपात स्वत:ला सिध्द करण्यात यश मिळवले आहे. तेच रवी दिवाण आता एका नव्या रुपात रसिकांसमोर येत आहेत. त्यांचा निर्मिती असलेला 'तिचा उंबरठा' या सिनेमाचा मुहूर्त नुकताच रविंद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांनी मुहूर्ताचा क्लॅप दिला आणि दिग्दर्शक प्रदीप घोनसीकर यांनी 'साउंड, कॅमेरा, अ‍ॅक्शन...' म्हणत अभिनेत्री तेजिस्विनी पंडित, अभिनेते चिन्मय मांडलेकर, ज्योती चांदेकर यांच्यावर मुहूर्ताचा शॉट ओके केला. या कार्यक्रमाला अभिनेता सुनील शेट्टी, मकरंद देशपांडे, भरत दाभोळकर, कांचन अधिकारी यांच्यासोबत बॉलिवूड-मराठी सिनेसृष्टीतील दिग्दज मान्यवरांची उपस्थिती होती.
'आरडीएक्स सिनेमा' बॅनरखाली तयार होणारा प्रदीप घोनसीकर दिग्दर्शित 'तिचा उंबरठा' हा सिनेमा महिलाप्रधान असल्याची जाणीव शीर्षकावरूनच होते. मुंबईत राहणा-या विभावरी नावाच्या उच्च-मध्यमवर्गीय संस्कारी गृहिणीची कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. पती, मुलगी, आई-वडील, भाऊ, सासू, नणंद यांच्या विश्वात आनंदाने जगणा-या विभावरीला अचानक एका धक्कादायक निर्णयाचा सामना करावा लागतो. त्यातून ती कशाप्रकारे स्वत:ला सावरते आणि स्वत:चा उंबरठा अर्थातच सासर जपण्यासाठी कशी कटिबध्द राहते त्याची कथा म्हणजे 'तिचा उंबरठा' सिनेमा आहे.
'फॉरेनची पाटलीण', 'चीरगूट' या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन कलेले प्रदीप घोनसीकर या सिनेमाचे दिग्दर्शक असून सुप्रसिध्द समीक्षक जयंत पवार यांनी सिनेमाचे लेखन केले आहे. चिन्मय मांडलेकर, तेजस्विनी पंडीत ज्योती चांदेरकर, हर्षा खांडेपारकर, सुयश टिळक, तुलिका निकम, भरत शर्मा, जयंत पायेकर, शितल शुक्ला, अभिनेय पाटेकर, अदिती सावंत आदी कलाकारांची सा सिनेमात महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. कलादिग्दर्शक नितिन देसाई या सिनेमाचे कलादिग्दर्शन करणार आहे. जसराज जोशी, कविता सेठ, अक्षता सावंत, पिंकी चिनॉय आदी गायकांच्या आवाजात या सिमनेमाची गाणी स्वरबध्द करण्यात येणार आहे. सय्यद अब्दुल रहिम या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या सिनेमा मुहूर्ताच्या सोहळ्याची काही छायाचित्रे...