आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravindra Jain Latest News, Divyamarathi, Sanjay Kapoor

संजय कपूरच्या चित्रपटासाठी रवींद्र जैन करताहेत प्रेमगीत संगीतबद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'राम तेरी गंगा मैली', 'चितचोर', 'परमवीर चक्र', 'अखियों के झरोकों से' यांसारख्या चित्रपटांना संगीत देणारे व आपल्या गीतलेखनाने बॉलिवूड समृद्ध करणारे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आणि गीतकार रवींद्र जैन सध्या एका नवीन चित्रपटाचे संगीत दिग्दर्शित करण्यात व्यस्त आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात असले तरी अनिल कपूरचा भाऊ संजय कपूर या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे.
चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित असून नायकास त्याचे प्रेम मिळाल्यानंतर खलनायकाचा सुरू होणारा संघर्ष असे चित्रपटाचे कथानक आहे. याच आशयाचे गाणे संगीतबद्ध करण्यात सध्या जैन गुंतलेले आहेत. हे गाणे सुरेश वाडकर यांनी गायले असून सध्या त्याचे रेकॉर्डिंग सुरू आहे. त्यांच्याबरोबर गायक मनोजदेखील हे गीत स्वरबद्ध करीत आहेत.
'रामायण', 'लव कुश' या रामानंद सागर प्रॉडक्शनच्या मालिकांसह अनेक मालिकांना संगीत देणारे जैन यांनी सत्तरच्या दशकात येसुदास यांच्याबरोबर 'ओ गोरिया रे' सारखी नैय्यासारख्या चित्रपटांमधील गाणीही गायली होती ज्यांना विशेष लोकप्रियता मिळाली होती. अलीकडील चित्रपटांच्या बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेत जैन आत नव्या पिढीला रुचेल अशा रचना लिहित आहेत. त्यातीलच संजय कपूरवर चित्रित होणारे गाणे सध्या जैन संगीतबद्ध करीत आहेत.
राजा को रानीसे प्यार हो गया यासारख्या गाण्यांमधून वनराजा, शक्तीसारख्या चित्रपटांमधून अभिनय करणारा संजय कपुरने अलिकडेच प्रिन्स, लक बाय चान्स यांसारख्या चित्रपटात छोट्या भूमिकांतून काम केले होते. जैन यांच्या गीतांचा समावेश असलेल्या आगामी चित्रपटात संजय मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असल्याने संजयला या चित्रपटाकडून अधिक अपेक्षा असणार आहे