आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reason Why Shah Rukh Khan Gifted A Car To Farah Khan Revealed

अखेर रहस्य उघड... म्हणून SRKने फराहला भेट दिली चमचमती कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतीच बातमी आली होती, की शाहरुख खानने आपली जिवलग मैत्रीण आणि दिग्दर्शिका फराह खानला एक मर्सिडिझ कार भेट स्परुपात दिली आहे. हे पहिल्यांदाच घडतेय असही नाहीये. किंग खानने यापूर्वीसुध्दा आपल्या खास मित्रांना अशी भेटवस्तू दिली आहे. यापूर्वी त्याने फराह खानला 'ओम शांती ओम' आणि 'मै हू ना' या सिनेमांवेळी एक कार भेट म्हणून दिली आहे. परंतु शाहरुख फराह यांच्या मैत्रीमध्ये असेही प्रश्न उपस्थित होते आहे, की तिचा पती शिरिष यामुळे आनंदी आहे का?
मानले जात आहे, की मागील काही वर्षांपूर्वी शाहरुख आणि फराह यांच्यामध्ये काही वाद चालू होता. तो अलीकडेच मिटला आहे. त्यामुळे फराह शाहरुखसोबत 'हॅप्पी न्यू इअर'मध्ये करण्यासाठी तयार झाली आहे. तसेच शिरिषनेसुध्दा सर्व रुसवे-फुगवे विसरून ऑल इझ वेल म्हटले आहे. सिनेमा पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी कार भेट देणा-या शाहरुखने यावेळी वेळेचा विलंब न करता संधीचा फायदा घेऊन आपली आवडती दिग्दर्शिका फराहला एक चमचमती कार भेट केली आहे. त्याचा 'हॅप्पी न्यू इअर' हा सिनेमा यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.
पुढे वाचा... शाहरुखनने शिरिषच्या कानशिलात का लगावली होती?