आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Recall: जेव्हा दिलीप साहेबांच्या बर्थडे पार्टीत थिरकल्या होत्या सायरा, पोहोचले होते दिग्गज मंडळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सायरा बानो आणि शाहरुख खान)
मुंबई- दिलीप कुमार यांना वाढदिवासाच्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्यांना खोकला-सर्दी आणि फुफ्फुसात संसर्ग झाल्याने मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डिस्चार्ज मिळताच चाहते त्यांना हॉस्पिटल बाहेर भेटण्यास गेले होते.
सायरा बानो यांनी सांगितले, की दिलीप साहेबांना ठिक आहेत, मात्र डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस काही जवळच्या लोकांसोबतच सेलिब्रेट केला जाणार आहे. सायरा यांनी काल रात्र मित्रांसाठी आणि जवळच्या काही लोकांसाठी घरी एक छोटी पार्टी आयोजित केली होती.
दिलीप साहेबांनी यांनी 'ज्वार भट' (1944) या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. मात्र या सिनेमातून त्यांना खास ओळख मिळाली नाही. त्यानंतर 1947मध्ये त्यांनी 'जुगनू'मध्ये काम केले. हा सिनेमा यशस्वी ठरला आणि लोकांनी त्यांना पसंत केले. या सिनेमानंतर दिलीप साहेबांनी 'शहीद', 'अंदाज', 'दाग', 'दीदार', 'मधुमती', 'देवदास', 'मुसाफिर', 'नया दौर', 'आन', 'आजाद'सारखे अनेक हिट सिनेमे दिले. प्रत्येक यशस्वी सिनेमानंतर त्यांचे नाव शिखरावर पोहोचत गेले.

2011मध्ये आयोजित केली होती बर्थडे पार्टी
दिलीप साहेब यांना हॉस्पिटपलमधून डिस्चार्ज करण्यात आले असले तरी सायरा मोठी बर्थडे पार्टी देणार नाहीये. मात्र, 2011मध्ये दिलीप कुमार यांचा बर्थडे धूमधडाक्यात साजरा करण्यात आला होता. त्यामध्ये बॉलिवूडचे दिग्गज मंडळी सामील झाले होते. आमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, ऋषी कपूरसह अनेक सेलेब्सनी उपस्थिती लावली होती. शाहरुखने या बर्थडे पार्टीत सायरा बानो यांच्यासोबत डान्सदेखील केला होता.
2011मध्ये सेलिब्रेट झालेल्या दिलीप कुमार यांच्या बर्थडे पार्टीची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...