आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एकामागून एक मिळत गेलेल्या नकारामुळेच वाढला आत्मविश्वास\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन स्टारर 'भूतनाथ रिटर्न्स' हा सिनेमा येत्या 11 एप्रिल रोजी रिलीज होतोय. या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत असलेल्या मराठमोळ्या उषा जाधव केवळ हिंदीतच नव्हे तर मराठीतही अनेकदा नकार घंटा ऐकावी लागली आहे. एकामागून एक मिळत गेलेल्या नकारालाच उषाने आपली हिंमत बनवली आणि राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. 'धग' या मराठी सिनेमातील भूमिकेसाठी उषाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सावळा रंग आणि ग्लॅमरस अभिनेत्रींसारखे लूक्स नसल्यामुळे उषाला अनेकदा दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी काम दिले नाही. याविषयी उषा सांगते, ''टीव्ही मालिकांच्या ऑडीशनवेळी कास्टिंग दिग्दर्शकाचे म्हणणे असायचे, की मुलगी सुंदर आणि गोरी असेल तर तिच्याकडून अभिनय आम्ही करुन घेऊ. अनेकांच्या मते मी हिरोईन मटेरियल नाहीये.''
उदरनिर्वाहासाठी उषाने अनेक जाहिरातीत छोटी भूमिकासुद्धा साकारली आहे. भविष्यात हिंदीत आणि मराठीत निवडक भूमिका निवडण्याचा निर्णय उषाने घेतला आहे.