आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: रेखा यांच्या आयुष्यात झाली होती 10 पुरुषांची एन्ट्री, मात्र गवसले नाही खरे प्रेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री रेखा)
मुंबईः 'खूबसूरत', 'खून भरी मांग', 'उमराव जान', 'धर्मात्मा', 'बीवी हो तो ऐसी', 'फूल बने अंगारे' यांसह अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणा-या रेखा यांचा आज वाढदिवस आहे. 1966 पासून सिल्व्हर स्क्रिनवर आपली जादू चालवणा-या रेखा यांनी वयाची साठ वर्षे पूर्ण केली आहेत. रिल आणि रिअल लाइफमध्ये त्या नेहमीच चर्चेत असणा-या रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नईत झाला. त्यांचे वडील जेमिनी गणेशन आणि आई
पुष्पावली दक्षिणेचे प्रसिद्ध अभिनेता-अभिनेत्री होते.
रेखा 1966मध्ये पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकल्या होत्या. बालकलाकार म्हणून 'रंगुला रत्नम' या तेलगु सिनेमात त्यांनी काम केले होते. तेव्हापासून सुरु झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास आजही सुरु आहे. याच महिन्यात 24 तारखेला त्यांची प्रमुख भूमिका असलेला सुपरनानी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
रेखा यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलगू, कानडी भाषेत 175हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. त्यांना त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. सिल्व्हर स्क्रिनवर अनेक अभिनेत्यांसोबत त्यांची जोडी जमली आणि ती लोकप्रियसुद्धा ठरली. खासगी आयुष्यात मात्र त्यांना खरे प्रेम गवसले नाही.
रेखा यांचे लग्न व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत झाले होते. मात्र मुकेश यांच्यापूर्वी रेखा यांचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जुळले होते. रेखा यांच्या लव्ह लाइफची लिस्ट मोठी आहे. या लिस्टमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ते नवीन निश्चल, विश्वजीत, जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, विनोद मेहरा या अभिनेत्यांच्या नावाचा समावेश आहे. रेखा यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या लव्ह लाइफविषयी सांगत आहोत.
रेखा यांच्या लव्ह लाइफविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...