बॉलिवूडची ग्रेसफुल अभिनेत्री रेखा यांनी निश्चय केला आहे, की त्या कोणत्याही अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभाग घेणार नाहीये. त्यांच्या लूकविषयी केल्या जाणा-या कमेन्ट्स या निर्णयामागील कारण असल्याचे कळते.
रेखा यांचा लूक ठरलेला म्हणजे, कांजीवरम साडी, गोल्ड ज्वेलरी, नेहमी एखाद्या सौभाग्यतीप्रमाणे त्यांचा लूक खूपच सुंदर दिसतो. कोणत्याही फंक्शनमध्ये त्या अशाच गेटअपमध्ये पोहोचतात.
त्यांच्या या स्टाइलवर अनेक कमेन्ट्स यायला लागल्या आहेत. म्हणून रेखा यांनी स्टाइल बदलण्याऐवजी या अवॉर्ड फंक्शनपासून दुर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरे कारण म्हणजे, एकसारखे अवॉर्ड फंक्शन, तेच व्यवस्थापन, त्याच स्टार्सच्या डान्सचा कंटाळा आला आहे. यावर्षी वयाच्या साठीत पदार्पण करणा-या रेखा एखाद्या दमदार भूमिकेच्या शोधात आहेत.