(बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी, रेहा कपूर आणि रेखा)
मुंबईः मंगळवारी मुंबईतील लाइटबॉक्स थिएटरमध्ये आगामी 'खुबसूरत' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. सोनम कपूर आणि फवाद खान स्टारर हा सिनेमा बघण्यासाठी कपूर घराण्यातील अनेक सदस्य पोहोचले होते.
'खुबसूरत'च्या स्क्रिनिंगला रेखा, श्रीदेवी, रेहा कपूर, मोहित मरवाह, संजय कपूर, महीप संधू, बोनी कपूर आणि नीलम कोठारीसह अनेक सेलेब्स पोहोचले होते. यावेळी सोनमची धाकटी बहीण आणि या सिनेमाची निर्माती रेहा कपूर रेखासोबत दिसली, तर नीतू कपूर आणि रीमा जैन एकत्र येथे पोहोचल्या होत्या.
'खुबसूरत' हा सिनेमा ऐंशीच्या दशकात रिलीज झालेल्या रेखाच्या सुपरहिट 'खुबसूरत' या सिनेमाचा रिमेक आहे. स्क्रिनिंगवेळी रेखाची क्लिक करण्यात आलेली छायाचित्रे बघता हा रिमेक बघून ती आनंदी असल्याचे दिसते. हा सिनेमा सशांक घोष यांनी दिग्दर्शित केला आहे. सोनम आणि फवाद यांच्यासह किरण खेर आणि रत्ना पाठक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा स्क्रिनिंगवेळी क्लिक झालेली सेलेब्सची छायाचित्रे...