मुंबई: जवळपास 33 वर्षांनी पुन्हा एकदा महानायक
अमिताभ बच्चन आणि ब्युटीफुल रेखा एकत्र काम करणार असल्याच्या चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगत आहेत. 'शमिताभ' सिनेमात दोघे झळकणार आहेत. हा सिनेमा आर बल्की दिग्दर्शित करत आहेत. सिनेमामुळे अमिताभ बच्चन यापूर्वीच चर्चेत आले होते. आता साउथ सुपरस्टार आणि बॉलिवूड 'रांझणा' फेम धनुषने माहिती दिली, की रेखासुध्दा या सिनेमात महत्वाची भूमिका साकारत आहेत.
धनुषने टि्वटरवर एक छायाचित्र पोस्ट केले, त्यामध्ये रेखा त्याच्यासोबत दिसत आहेत. या छायाचित्रासोबत त्याने लिहिले, की 'पाहा 'शमिताभ'मध्ये मी कोणासोबत स्पेस शेअर करत आहे. या आहेत वन अँड ओन्ली रेखाजी.' रेखा यांची कोणती भूमिका सिनेमात असणार आहे हे अद्याप माहित झालेले नाहीये. अमिताभ बच्चन आणि रेखा व्यतिरिक्त धनुष आणि साउथ सुपरस्टार कमल हसन यांची मुलगी अक्षरासुध्दा मुख्य भूमिकेत आहे.
अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केले
बिग बी आणि रेखा यांनी 'सुहाग'(1979), 'खून पसीना',(1977) 'मिस्टर नटवरलाल'(1979), 'दो अनजाने'(1976), 'आलाप'(1977), 'नमक हराम'(1973), 'मुकद्दर का सिकंदर'(1978), आणि 'सिलसिला'(1981)सारख्या सिनेमांत काम केले आहे. 1981मध्ये यश चोप्रा यांच्या 'सिलसिला'मध्ये दोघांनी एकत्र आणि शेवटचे काम केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहू शकता रेखा आणि बिग बी यांच्या फिल्मी रोमान्सची छायाचित्रे...