(फाइल फोटोः रेखा आणि मुकेश अग्रवाल)
मुंबईः रेखा यांचे चाहते अगणिक आहेत, मात्र रेखा
अमिताभ बच्चन यांची चाहती होती. सत्तरच्या दशकात रेखा आणि अमिताभ यांच्या प्रेमाचे किस्से अनेक वृत्तपत्रांमध्ये चर्चिले गेले होते. मात्र अचानक रेखा आणि अमिताभ यांचे मार्ग विभक्त झाले. अमिताभ यांनी पुन्हा कधीही रेखा यांच्याकडे वळून पाहिले नाही. 3 जून 1973 रोजी त्यांनी जया यांची जोडीदाराच्या रुपात निवड करुन त्यांच्यासोबत लग्न केले. रेखा यांनी तब्बल 17 वर्षे अमिताभ यांची वाट पाहिली आणि अखेर 1990 मध्ये दिल्लीतील एका उद्योगपतीसोबत लग्न केले.
मुकेश अग्रवाल हे रेखा यांच्या पतीचे नाव. ते
आपल्या काळातील प्रसिद्ध हॉटेललाइन ग्रुप आणि निकिताशा ब्रॅण्डचे मालक होते. रेखा आणि मुकेश यांची छायाचित्रे पाहिली असता, रेखा ज्या प्रेमाच्या शोधात होत्या, ते त्यांना गवसले होते, असचे दिसून येते. मात्र दुर्दैवाने हे नाते फार काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या वर्षभरातच म्हणजे 1991 मध्ये मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी बातमी आली होती, की मुकेश यांनी रेखा यांच्या ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. इतकेच नाही, तर त्यांच्या निधनानंतर रेखा यांना त्यांच्या नात्यात कोणत्या कारणामुळे मतभेद निर्माण झाले, असे प्रश्न उघडपणे विचारण्यात आले.
पुढे वाचा, लोकांच्या मते मुकेश होते रागीट स्वभावाचे...