आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मुर्ती यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मुर्ती यांची सोमवारी सकाळी त्यांच्या बंगळूरु येथील निवासस्थानी प्राणज्योत मालवली. ते 91 वर्षांचे होते.
दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या सिनेमांचे ते सिनेमॅटोग्राफर होते. 'प्यासा' या सिनेमातील 'वक्त ने किया क्या सितम' या गाण्यातील त्यांनी चित्रीत केलेला 'बिम शॉट' प्रसिद्ध झाला होता. या सिनेमासाठी त्यांना 1959 मध्ये फिल्मफेअरचा बेस्ट सिनेमॅटोग्राफर अवॉर्ड मिळाला होता. भारतीय सिनेसृष्टीला दिलेल्या योगदानासाठी त्यांना आयफा 2005 मध्ये त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी ठरलेले व्ही. के. मुर्ती पहिले सिनेमॅटोग्राफर होते
मुर्ती यांनी कमाल अमरोही यांच्यासोबत 'पाकिजा' आणि 'रझिया सुलतान' या सिनेमासाठी काम केले होते. 26 नोव्हेंबर 1923 रोजी जन्मलेल्या मुर्ती यांनी बंगळूरु येथील सिनेमॅटोग्राफीमध्ये डिप्लोमा केला होता. मुर्ती यांनी सिनेमास्कोपवर चित्रीत केलेला 'कागज के फूल' हा पहिला भारतीय सिनेमा आहे.