आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Retro Looks Of Anushka, Ranbir, Raveena In ‘Bombay Velvet’

पाहा रणबीर-अनुष्काचा 'बॉम्बे वेलवेट'मधील FIRST LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि रणबीर कपूर-अनुष्का शर्माची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी `बॉम्बे वेलवेट` या सिनेमाचे शुटिंग पूर्ण झाले आहे. सिनेमाच्या शेवटच्या टप्प्यातील शुटिंग श्रीलंकेत पूर्ण झाले. या सिनेमाद्वारे रवीना टंडन ब-याच दिवसांनी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात रणबीर, अनुष्का आणि रवीना रेट्रो लूकमध्ये दिसणार आहेत.
25 डिसेंबर 2014 रोजी रिलीज होणा-या या सिनेमातील कलाकारांचा लूक कसा असेल याची पहिली झलक समोर आली आहे. सिनेमाच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवर या तिघांचा सिनमातील फस्ट लूक रिव्हील करण्यात आला आहे. सिनेमात रणबीरने जॉनी बलराज नावाचे पात्र साकारले असून तो बॉक्सर आणि स्ट्रीट फायटर आहे. अनुष्का शर्माच्या पात्राचे नाव रोजी असून ती जॅज सिंगर आहे. तर रवीनानेसुद्धा जॅज सिंगरची भूमिका साकारली आहे.
'बॉम्बे वेलवेट'चे शुटिंग पूर्ण झाल्यानंतर सिनेमाच्या संपूर्ण टीमने अनुष्काला शॅम्पेनची बाटली, फुलांचा गुलदस्ता आणि केक भेट रुपात दिला. या केकवर लिहिले होते, 'धन्यवाद रोजी. आमच्या स्टार स्टार गायिकेला खूप खूप शुभेच्छा.’
वरील छायाचित्रात रणबीर जॉनीच्या लूकमध्ये दिसत आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा अनुष्का आणि रवीनाचा लूक आणि सोबतच शुटिंगदरम्यानची छायाचित्रे...