आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहितला घेत शाहरुखने मारली बाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: रोहित शेट्टी आणि शाहरुख खान
सूत्रानुसार, करण दीड वर्षापासून रोहित मोकळा होण्याची वाट पाहत होता. मात्र, चांगली कथा न मिळाल्याचे कारण सांगत रोहितने सुरुवातीला ‘सिंघम रिटर्न्‍स’ केला आणि आता शाहरुखसोबत काम करणार आहे.
‘सिंघम रिटर्न्‍स’नंतर रोहित अजय देवगणसोबत दुसरा प्रोजेक्ट किंवा करण जोहर बॅनरच्या सिनेमाचे दिग्दर्शन करणार होता. मात्र, शाहरुखने रोहितला आपल्या सिनेमाकडे वळवले असून त्याचे शुटिंग वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या करिअरची सुरुवात अजय देवगणच्या सिनेमातील स्टंट दृश्ये पाहत झाली. त्यानंतर अजय देवगण बॅनरच्या (‘हिंदुस्तान की कसम’, ‘राजू चाचा’) सिनेमांमध्ये सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली. 2003 मध्ये ‘जमीन’हा पहिला सिनेमादेखील त्याने अजयसोबतच बनवला. तीन वर्षांनंतर ‘गोलमाल’द्वारे रोहित-अजय जोडी बॉलीवूडमध्ये हिट ठरली. तेव्हापासून 2012 पर्यंत जवळपास प्रत्येक वर्षी दोघांचे सिनेमे (गोलमाल, संडे, गोलमाल रिटर्न्‍स, ऑल द बेस्ट, गोलमाल-3, सिंघम, बोल बच्चन) प्रदर्शित झाले. मात्र, 2013 मध्ये शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’चे दिग्दर्शन रोहितने केल्याने या जोडीचे गणित बदलले. निर्माता म्हणून शाहरुखने या सिनेमात खूप पैसे लावले आणि उत्पन्नही 225 कोटींच्या वर झाले.
शाहरुखच्या जवळचा असलेल्या करण जोहरने दीड वर्षापूर्वी रोहितला आपल्या धर्मा प्रोडक्शन्ससाठी साइन केले. करणसोबत सिनेमा बनवण्यासाठी रोहितला दिग्दर्शनाच्या मानधनापैकी मोठी रक्कम आगाऊ म्हणूनही मिळणार आहे. मात्र, शाहरुखच्या सिनवेमात व्यस्त असल्यामुळेकरणच्या सिनेमाचे शुटिंग सुरू झाली नाही. यापुढेदेखील सुरू होईल, याची शक्यता फारच कमी आहे. यादरम्यान शाहरुखने आपला आगामी चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी रोहितला पहिल्यांदाच तयार केले आहे. हा सिनेमा वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे.
यामुळे करणचा सिनेमा तर अडकणारच, शिवाय अजय देवगणसोबतदेखील रोहित अन्य सिनेमा बनवू शकणार नाही. ऑगस्टमध्ये तो अजय अभिनीत ‘सिंघम रिटर्न्‍स’ प्रदर्शित करून शाहरुखच्या सिनेमावर काम सुरू करणार आहे. शाहरुखने आपल्या या सिनेमाद्वारे चतुर डाव खेळला आहे. शिवाय अजय आणि करण दोघांनाही त्याने आव्हान दिले आहे.‘सन ऑफ सरदार’ व ‘जब तक है जान’च्या प्रदर्शनावेळी थिएटरच्या संख्येवरून अजय-शाहरुखमध्ये वाद झाला होता. काही दिवसांपूर्वी दोघांनी मुंबईतील एका स्टुडिओमध्ये एकमेकांची गळाभेट घेतली होती.