नवी दिल्ली: 'ओए लकी-लकी ओए' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर'सारख्या सिनेमांमध्ये काम केलेली अभिनेत्री रिचा चढ्ढाची नवी दिल्लीच्या अंतराष्ट्रीय विमानतळावर जवळपास दोन तास चौकशी करण्यात आली. दोन तासांच्या विचापूसनंतर तिला सोडून देण्यात आले.
ती गुरूवार (19 जून) दिल्लीहून मुंबईला रवाना झाली होती. सुरक्षा अधिका-यांनी सांगितले, तिच्याकडे एक पावडर पुडी आढल्याने तिची चौकशी करण्यात आली. तिच्या बॅगमध्ये एक आयुर्वेदिक पावडर ठेवलेले होते. या पावडरचा वापर ती तिच्या त्वचेसाठी करते.
सुरक्षा अधिकारी याबद्दल साशंक असल्याने त्याने ते पावडर ताब्यात घेतले आणि तिची चौकशी केली. रिचा याविषयी म्हणते, 'मला माहित होते, की सुरक्षा अधिकारी त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे मी त्यांना पूर्ण सहकार्य केले. मी कोणतेही चुकिचे पावडर माझ्याकडे बाळगले नव्हते.'