आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थ डे पार्टीत ऋचाचा दिसला ग्लॅमरस लूक, पत्नीसोबत पोहोचला पुलकीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पुलकीत सम्राट पत्नी श्वेतासोबत आणि आणि ऋचा चड्ढा)
मुंबईः 'गँग्स ऑफ वासेपूर' या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेली अभिनेत्री ऋचा चड्ढा हिने 17 डिसेंबर रोजी 26 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने ऋचाने एक जंगी बर्थडे पार्टी आयोजित केली होती. ऋचाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी या पार्टीत सहभागी झाले होते.
पार्टीत ऋचा ब्लॅक डीकेएलवाय गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसली. तिचा हा गाउन बॅकलेस होता. पार्टीत 'फुकरे' या सिनेमात ऋचासोबत झळकलेले अभिनेते वरुण शर्मा, अली फजल पार्टीत पोहोचले होते. तर अभिनेता पुलकीत सम्राट पत्नी श्वेतासोबत पार्टीत आला होता. याशिवाय अदिती राव हैदरी, स्वरा भास्कर, कुणाल कोहली, रितेश सिद्धवानी, सोनू निगम, अनुराग कश्यप, निम्रत कौर, मनीष मल्होत्रा, आयुष्मान खुराणा यांनीही पार्टीला चारचाँद लावले.
ऋचाने ओए 'लकी लकी ओए' (2008) या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. 'गँग्स ऑफ वासेपूर' या सिनेमामुळे ऋचा प्रसिद्धीझोतात आली. याचवर्षी तिचा 'तमंचे' हा सिनेमा रिलीज झाला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ऋचाच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलिब्रिटींची छायाचित्रे..