आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Richard Gere And Padma Lakshmi Keep Their Romance Secret

पद्मा लक्ष्मीला डेट करत आहेत रिचर्ड गेर, शिल्पा शेट्टीला किस करून उडवली होती खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हॉलिवूड सुपर रिचर्ड गेर आणि पद्मा लक्ष्मी)
मुंबई: हॉलिवूड सुपरस्टार रिचर्ड गेर अफेअरमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रिचर्ड गेर काही दिवसांपासून भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक सलमान रश्दी यांच्या माजी पत्नी आणि मॉडेल पद्या लक्ष्मीसह डेटींग करत असल्याची सर्वत्र चर्चा आहे. पद्मा लक्ष्मी 'बूम' या बॉलिवूड सिनेमातून समोर आली होती. तसेच, रिचर्ड यांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला किस सार्वजनिक ठिकाणी करून सर्वत्र खळबळ उडवली होती.
पद्मा लक्ष्मी आणि रिचर्ड यांनी मीडिया आणि सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून दूरावा ठेवला. त्यांनी आपल्या नात्याविषयी नेहमी मौन बाळगले. मात्र न्यू जर्सीच्या एका रेस्तरॉमध्ये दोघांना एकत्र बघितल्या गेले. 64 वर्षीय रिचर्ड गेर आणि 43 वर्षीय पद्मा लक्ष्मी दिर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार, रेस्तरॉमध्ये दोघे प्रेमीयुगलाप्रमाणे वावरत होते. पद्मा लक्ष्मी रिचर्ड यांना डिझाइन टीप्स देत होती.
यापूर्वी रिचर्ड यांनी हॉलिवूड अभिनेत्री कॅरी लोव्हेलशी लग्न केले होते. जेम्स बाँडची हिरोइन राहिलेली कॅरी लोव्हेल आणि रिचर्ड यांनी एक 14 वर्षांचा मुलगा आहे. दोघे 2013मध्ये एकमेकांपासून विभक्त झालेत मात्र त्यांनी कायदेशिरित्या घटस्फोट घेतलेला नाहीये. तसेच पद्मा लक्ष्मीसुध्दा सलमान रश्दी यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर उद्योगपती फोस्टमॅनसह डेटींग करत होती. पण फोस्टमॅनचा 2011मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. लक्ष्मी आणि सलमान रश्दी यांचा 2007मध्ये घटस्फोट झाला. 1999मध्ये पद्मा लक्ष्मी, रश्दी यांना एका पार्टीत भेटली होती. दोघांनी 2004मध्ये लग्न केले होते. सलमान रश्दी पद्मापेक्षा 23 वर्षांनी मोठे होते.
पद्मा लक्ष्मीने कैजाद गुस्ताद यांच्या 'बूम' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. या सिनेमात कतरिना कैफसुध्दा पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये रुपेरी पडद्यावर झळकली होती.
रिचर्ड यांच्याविषयी सांगायचे झाले तर, 15 एप्रिल 2007मध्ये एड्सबाबत जागरुकता करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेर यांनी शिल्पा शेट्टीला खुलेआम किस केले होते. हे प्रकरण बरेच वादग्रस्त ठरले होते. रिचर्ड गेर हे दलाई लामा यांचे अनुयायी असल्याने त्यांचे भारतात येणे-जाणे चालूच असते. रिचर्ड यांचा 'शॅल व्ही डान्स' आणि 'प्रेशर' हे सिनेमे प्रसिध्द आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कसे शिल्पा आणि रिचर्ड गेर यांनी किसच्या छायाचित्रांमधून उडवली होत खळबळ...सोबतच पाहा सलमान रश्दीसह पद्मा लक्ष्मीचे छायाचित्रे...