आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या \'ग्रॅमी\' पुरस्कारावर भारतीय मोहोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: नीला वासवानी आणि रिकी केज
लॉस एंजिलिस- जागतिक स्तरावर संगीत क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या यंदाच्या ५७व्या ग्रॅमी पुरस्कारांवर दोन भारतीयांनी मोहोर उमटवली. बंगळुरू स्थित संगीतकार रिकी केज व नीला वासवानी यांना "नव्या युगाचे गीत' या श्रेणीत सर्वोत्कृष्ट सन्मान मिळाला. रिकी यांच्या "विंड‌्स ऑफ संसारा' अल्बमला हा बहुमान मिळाला. वासवानी यांचा मुलांसाठीचा "आय अॅम मलाला' हा अल्बम सर्वोत्कृष्ट ठरला.

‘सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत‘ श्रेणीत सतारवादक पं. रविशंकर यांच्या कन्या अनुष्का शंकर यांना मात्र पुरस्काराने हुलकावणी दिली.