मुंबई: साजिद खान दिग्दर्शित 'हमशकल्स' नुकताच रुपेरी पडद्यावर झळकला आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी अर्थातच शुक्रवारी (20 जून) 12.5 कोटींचा व्यवसाय करून धमाकेदार सुरूवात केली. यानिमित्त काल (21 जून) 'हमशकल्स'च्या टीमने तमन्ना भाटियाच्या घरी एक पार्टी केली. या पार्टीमध्ये सिनेमाचे स्टारकास्ट सामील झाले होते. त्यामध्ये रितेशची पत्नी जेनेलियासुध्दा पोहोचली होती.
जेनेलिया प्रेग्नेंट असल्याने 'हमशकल्स' टीमने तिच्यासह डिनरचे खास आयोजन केले होते. या पार्टीमध्ये पोहोचलेल्या सेलेब्समध्ये दिग्दर्शक साजिद खान, रितेश देशमुख, ईशा गुप्ता सामील होती. यावेळी जेनेलिया काळ्या टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये दिसली. तसेच रितेश राखडी रंगाच्या टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसला. तमन्ना आपल्या पाळीव कुत्र्यासह दिसली.
'हमशकल्स'मध्ये
सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर यांचा ट्रिपल भूमिका आहे. हा सिनेमा 1982मध्ये आलेल्या 'अंगूर' सिनेमाशी प्रेरित आहे. 'अंगूर' सिनेमा व्हिलियम शेक्सपिअरच्या 'कॉमेडी ऑफ एरर्स'वर आधारित होता. त्या सिनेमात संजीव कुमार आणि देवेन वर्माने दुहेरी भूमिका साकारली होती. 'हमशकल्स'चे म्यूझिक हिमेश रेश्मियाने दिले असून वासू भगनानीने निर्मित केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा तमन्नाच्या घरी झालेल्या डिनर पार्टीमध्ये पोहोचलेले सेलेब्सची छायाचित्रे...